फुलंब्री तालुक्यातील खामगाव गोरक्षनाथ येथील ग्रामपंचायत मार्फत होत असलेल्या बोगस कामाची चौकशीची मागणी गटविकास अधिकारी यांच्याकडे उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य यांनी निवेदनाद्वारे केली आहे
फुलंब्री तालुक्यात 93 गावाचा समावेश असून यात 71 ग्रामपंचायतीचा समावेश असून यात काही ग्रामपंचायती यांनी आपल्या कामातून जिल्ह्यात आदर्श निर्माण व्हावा असे काम केले आहे तर काही ग्रामपमचायतींच्या पदाधिकारी यांनी सतेचा दुरुपयोग करत आपला मनमानी कारभार करत,शासनाने दिलेल्या निधीची विल्हेवाट करण्याचे काम करीत असल्याचं दिसून येत आहे.
असाच एक प्रकार फुलंब्री तालुक्यातील खामगाव गोरक्षनाथ येथील ग्रामपंचायतीच्या माध्यमातून झाला असल्यास निदर्शनास आले असून,याठिकाणी असलेल्या महिला सरपंच पती आपला मनमानी कारभार करत,गावातील विकास कामे निकृष्ट दर्जाचे करत असल्याचा आरोप केला असून गटविकास अधिकारी,व तहसीलदार यांना याबाबत निवेदन देण्यात आले असून या निवेदनामध्ये सदरील गावात सरपंच पद हे महिला कडे असून सर्व कारभार सरपंच पतीचं पाहत आहे.यातून आता गावात दलित वस्ती साठी असणारे पेव्हर ब्लॉक हे खामगाव बाबरा या मुख्य रस्त्यालगत बसवत असून यातून शासनाची दिशाभूल करून पैसे उकळण्याचे काम करीत आहे,त्याच प्रमाणे गावा लगत असलेल्या झोपडपट्टी परिसरात ड्रेनेज लाईन चे काम झाले असून यातून अस्वच्छ पाणी बाहेर निघण्याऐवजी पुन्हा घरात घुसत आहे,त्यामुळे त्या पाण्यात आळ्या होत असून नागरिकांचे आरोग्य धोक्यात येत आहे,याच प्रमाणे हे ड्रेनेज चे पाणी साठी टॅंक असणे आवश्यक असताना हे पाणी गावातील रोडवरील मुख्य रस्त्यावरील नाल्यात सोडण्यात आले असून या नाल्याजवळच महापुरुषाच्या स्मारकाचे काम चालू आहे,
तसेच गावात हागणदारीमुक्त मोहीम राबविण्यात आली मात्र आज ही गावात असलेल्या रोडवर संपूर्ण अस्वच्छता दिसून येत आहे,त्याच प्रमाणे हगणदारीमुक्तीचा बोर्ड असलेला ठिकाणी कचऱ्याचे साम्राज्य पसरले आहे. ग्रामपंचायतच्या माध्यमातून गावातील कचरा वाहून नेण्यासाठी घटा गाडी खरेदी केलेली आहे ,मात्र तिचा आज पर्यंत लाभ झालेला नाही,व ती सरपंच यांनी सुरक्षित ठिकाणी उभी करण्यात आली आहे,त्याच प्रमाणे गावंतर्गत रस्ते झाले होते ते ही निकृष्ट दर्जाचे झाले असून काल मर्यादेच्या आतच ते खराब झाले आहे.त्याच प्रमाणे ग्रामसेवक,सरपंच पती,व अभियंते आपली मनमानी कारभार करून शासनाचा निधीची वाट लावण्याच काम करीत आहे.त्याची सखोल अशी चौकशी करून कारवाई करण्यात यावी याकरिता निवेदन देण्यात आले असून निवेदनावर उपसरपंच जगनाथ सोनवणे व ग्रामपंचायत सदस्य गणेश अनदाते यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.