बीड (प्रतिनिधी) बीड येथील मिल्लिया कला, विज्ञान व व्यवस्थापनशास्त्र महाविद्यालयात दिनांक 29 ऑगस्ट 2022, सोमवार रोजी राष्ट्रीय क्रीडा दिवस साजरा करण्यात आला. कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून बीपीएड महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रवींद्र काळे, अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. हुसैनी एस. एस, महाविद्यालयाचे उपप्राचार्य तथा क्रीडा संचालक डॉ. सय्यद हनीफ, डॉ. भीमराव माने यांची उपस्थिती होती. हॉकीचे जादूगर मेजर ध्यानचंद यांचा जन्म दिवस हा राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरा केला जातो. प्रथम मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. महाविद्यालयाचे उपप्राचार्य तथा क्रीडा संचालक डॉ. सय्यद हनीफ यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले तसेच मेजर ध्यानचंद यांचे हॉकीमध्ये देशासाठी दिलेल्या योगदानाची माहिती दिली. प्रमुख अतिथी बीपीएड महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.रवींद्र काळे यांनी क्रीडा दिनाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांना खेळाचे महत्व व नियमित शारीरिक व्यायाम, संतुलित आहार, योगासने, प्राणायाम यांचे महत्त्व सांगितले. कार्यक्रमाचे अध्यक्ष उपप्राचार्य डॉ.हुसैन एस. एस. यांनी विद्यार्थ्यांनी अभ्यासाबरोबरच खेळामध्ये सुद्धा प्राविण्य मिळवावे असे सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन क्रीडा संचालक उपप्राचार्य डॉ. सय्यद हनीफ यांनी तर आभार प्रदर्शन शारीरिक शिक्षण विभागाचे डॉ. फारूक सौदागर यांनी केले. कार्यक्रमास प्राध्यापिका डॉ. संध्या बिडकर, डॉक्टर अब्दुल समद डॉ.रमेश वारे, डॉ. सय्यद रफतअली, डॉ. शेख हुसेन,विद्यार्थी- विद्यार्थिनी, प्राध्यापक वृंद व कर्मचारी वृंद यांची उपस्थिती होती. कार्यक्रमास महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मोहम्मद इलयास फाजील यांचे सहकार्य लाभले.
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
Market Latest IPO News: आज Doms Industries, India Shelter का खुलेगा IPO, निवेश से फायदा?
Market Latest IPO News: आज Doms Industries, India Shelter का खुलेगा IPO, निवेश से फायदा?
India Winning Celebration, Pakistan को हराने पर Afghanistan का ये Video Viral | India vs Pakistan
India Winning Celebration, Pakistan को हराने पर Afghanistan का ये Video Viral | India vs Pakistan
શહેરના આઝાદ ચોક ખાતે 78 માં સ્વતંત્રતા પર્વની ઉજવણી કરાઈ
શહેરના આઝાદ ચોક ખાતે 78 માં સ્વતંત્રતા પર્વની ઉજવણી કરાઈ ભાજપ શહેર પ્રમુખના વરદ હસ્તે ધ્વજ વંદન...
સાંતલપુર : દરિયા લાલ મંદિર ખાતે યજ્ઞ યોજાયો | SatyaNirbhay News Channel
સાંતલપુર : દરિયા લાલ મંદિર ખાતે યજ્ઞ યોજાયો | SatyaNirbhay News Channel
China के BRI कॉरिडोर को क्या चुनौती दे पाएगा India, Saudi और America का IMEC कॉरिडोर (BBC Hindi)
China के BRI कॉरिडोर को क्या चुनौती दे पाएगा India, Saudi और America का IMEC कॉरिडोर (BBC Hindi)