अध्यक्षपदी हिंमत ढाळे उपाध्यक्षपदी भरतकुमार मोरे ,सचिव सुरेश लांडे
सोलापूर :- नवोदित साहित्यिकांचे हक्काचे विचारपीठ असलेल्या अंकुर साहित्य संघाच्या केंद्रीय कार्य करण्याची बैठक नुकतीच होऊन अंकुर साहित्य संघाच्या केंद्रीय अध्यक्षपदी हिम्मत ढाळे कार्याध्यक्ष पदी तुळशीराम बोबडे, सचिवपदी सुरेश लांडे उपाध्यक्षपदी भरत कुमार मोरे यांची एकमताने बिनविरोध निवड करण्यात आली.
इतर कार्यकारिणी याप्रमाणे
उपाध्यक्ष पदी प्रा संजय कावरे डॉ. प्रमोद काकडे रेखाताई शेकोकार डॉ. जब्बार पटेल सुरेश गांजरे प्रिया धि. भोंडे कोषाध्यक्ष पदी डॉ. मनोहर घुगे सहसचिव पदी शिवलिंग काटेकर महिला परिषद प्रमुख विद्याताई बनाफर कार्यकारी सदस्य शीलाताई राजपूत प्रा मधुकर वडोदे प्रा. मोहन काळे संघटक डॉ. शांतीलाल चव्हाण ,विजय पाटील, देवानंद गहिले, अमोल गोंडचवर, किशोर देशमुख, शिवराज जामोदे, प्रमुख मार्गदर्शक प्रा. सदाशिव शेळके, अँड अनिल लव्हाळे ,प्रा .डॉ. अशोक सिरसाट, महिला संघटक कविता राठोड, क्रांती क्षीरसागर, प्रसिद्धी प्रमुख राजेश काटोले, विभागप्रमुख विदर्भ - वासुदेव खोपडे मराठवाडा- प्रकाश धादगिने उत्तर महाराष्ट्र- प्रा डॉ. साधना निकम मुंबई- महेंद्र राऊत पश्चिम महाराष्ट्र- हसन सो देसाई कोकण मिनाताई खंडाळे
या कार्यक्रमाला अंकुरचे विष्णुपंत जोध, कृष्णराव घाडगे, सुमेध वानखडे, दीपक फाळके, रूस्तम होनाळे नारायण अंधारे, , बाळासाहेब सोळंके, , प्रभाकर दिवनाले, संतोष इंगळे,कृष्णराव घाडगे प्रभाकर दिवनाले, सुनिल लव्हाळे प्रशांत भोंडे राजाभाऊ देशमुख शिवाजी वानखडे, मारोती नागोसे दगडू वाहूरवाघ धिरज चावरे, , संजय गावंडे अनंत अंधारे, उमा गवई आणि बहुसंख्य रसिक उपस्थित होते
अंकुर साहित्य संघाचा ३६ वा वर्धापन दिनाचे औचित्य साधून अंकुर साहित्य संघाचे संस्थापक अध्यक्ष स्व. हिम्मत शेकोकार यांच्या पुण्यतिथीचा कार्यक्रम नुकताच संपन्न झाला.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष अमरावती येथील प्रसिद्ध साहित्यिक डॉ. प्रमोद काकडे अंकुरच्या राजमाता शीलाताई राजपूत, रेखाताई शेकोकार, प्रा मधुकर वडोदे तुळशीरामजी बोबडे हे होते या कार्यक्रमाचे प्रास्ताविक अंकुर साहित्य संघाचे केंद्रीय अध्यक्ष आ. हिम्मत ढाळे यांनी अंकुर साहित्य संघाचा प्रवास हिम्मतजी शेकोकार यांच्यासोबत च्या आठवणींना उजाळा देऊन प्रास्ताविकातून उलगडून दाखविला त्यानंतर डॉ. प्रमोद काकडे यांनी अंकुर चा वटवृक्ष कसा झाला हे सांगितले. राजमाता शीलाताईंनी अंकुर मुळे आज जे प्रस्थापितांमध्ये आहेत ज्यांना अंकुरने मोठं केलं ते कदाचित अंकुर चे नाव सुद्धा काढत नाहीत ही शोकांतिका व्यक्त केली. तुळशीराम बोबडे , प्रा मधुकर वडोदे यांनी मनोगत व्यक्त केली सूत्रसंचालन आ.धीरज चावरे यांनी केले. केंद्रीय अध्यक्ष हिंमत ढाळे यांनी त्यांच्या अध्यक्षपदाच्या कार्यकाळातील इतिवृत्त वाचून दाखविले. त्या कार्यकाळातील कार्याच्या उपक्रमाचा लेखाजोखा वाचून दाखविला.