अकोला:- (नितीन थोरात) जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यातील ग्राम मनब्दा येथील एक धक्कादायक घटना समोर आली आहे, गावातील दोन शाळकरी मुलांचा नदीपात्रात बुडून मृत्यू झाला आहे. सादर घटनेची माहिती मिळताच गावात शोककळा पसरली आहे.

गावातील दोन मुले एकाचे वय १४ व दुसऱ्याचे वय 12 वर्ष हे दोन्ही शाळकरी मुले आज रविवार असल्यामुळे गावाच्या लगतच असलेल्या अटकळी मनब्दा रोडवर विदृपा नदीत जलयुक्त शिवारासाठी खोल केलेल्या नदीपात्रात अंघोळीसाठी उतरले पण त्या चिमुकल्याना पाण्याचा अंदाज न आल्याने दोन्ही मुले बुडाली.विशेष म्हणजे या दोन्ही मुलांना पोहता येत नव्हते, नदीपात्रात केलेल्या या खड्ड्यात जवळपास १५ ते २० फूट पाणी असल्याने त्यांना अंदाज आला नसावा. पाणी पाहून त्यांना अंघोळीचा मोह आवराला नाही आणि अशातच दोघांनीही पाण्यात उड्या घेतल्या व तिसरा त्यांच्यापैकी जो लहान होता तो गंमत पाहत होता बराच वेळ झाला तरी मुले बाहेर येत नाही हे पाहून लहान मुलगा गावाकडे धावत गेला व गावात बातमी सांगितली लगेच गावकरी त्या नदीकडे धावत सुटले परंतु तोपर्यंत खूप वेळ झाला होता, दोघांच्याही आईने एकच टाहो फोडला.

तेल्हारा पोलीस स्टेशनला जशी माहिती मिळाली तशी क्षणाचाही विलंब न करता पोलीस कर्मचारी घटना स्थळी पोहचले स्थळ पंचनामा करून शव उत्तरीय तपासणी साठी तेल्हारा ग्रामीण रुग्णालयात पाठवले. विशेष म्हणजे दोन्हीही मुले भूमिहीन शेतमजूराची मुले आहेत.