वाघोली परिसरात पावसाळी छत्र्यांचे यांचे वाटप
ज्ञानेश्वर कटके यांच्या सौजन्याने उपक्रम.
वाघोली प्रतिनिधी
नितीन शिंदे
वाघोली(ता.हवेली)येथे जि.प.सदस्य ज्ञानेश्वर कटके यांच्या सौजन्याने लोकांना सेवा पुरविणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्यांना तसेच विद्यार्थी व समाजासाठी काम करणारे कर्मचारी यांना कर्तव्यरूपी मदत म्हणून छत्री वाटप करण्यात आले.
वाघोली परिसरातील सातव स्कूल,जिल्हा परिषद शाळा, अंगणवाडी सेविका,आशा वर्कर, सरकारी दवाखाना कर्मचारी व इतर सार्वजनीक कर्मचारी तसेच महिला बचत गट,भाजी विक्रेते, रस्त्यावरील काम करणारे लोक, सोसायटी मधील सफाई कामगार व सुरक्षारक्षक, स्वच्छ पुणे सेवा सहकारी संस्थेच्या सभासदांना गार्डन छत्री,अंगणवाडी येथील दीडशे विद्यार्थ्यांना छत्रीचे वाटप करण्यात आले.
यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख ज्ञानेश्वर कटके,शिवसेना विभाग संघटक कविता दळवी,वाघोली शहर प्रमुख वंदना घोलप, उपशहर प्रमुख अश्विनी पांडे, अश्विनी सातव, उपविभाग संघटक मीरा शिंदे त्यांच्यासह महिला पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.