गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आयोजित शांतता समितीच्या बैठकीत पोलीस प्रशासनातर्फे विविध सुचना देण्यात आल्या. जउळका पोलीस स्टेशन तर्फे गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर आज शनिवार दिनांक २८ रोजी दुपारी शांतता समिती गणेश मंडळाचे पदाधिकारी मान्यवर पोलीस पाटील व नागरिक यांची बैठक घेण्यात आली. गणेश उत्सव सर्वांनी शांततेत साजरा करावा असे आवाहन पोलीस प्रशासनातर्फे यावेळी करण्यात आले.  गणेश उत्सव काळात कोणकोणत्या सूचनाचे पालन करावे. याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. गणेश मंडळांनी आरास उभारताना कुणाच्या भावना दुखावल्या जाणार नाही याबाबत दक्षता पाळावी असे सुचित करण्यात आले. तालुका दंडाधिकारी काळे साहेब, उपविभागीय अधिकारी केडगे साहेब, ठाणेदार आदिनाथ मोरे साहेब, पोलीस उपनिरीक्षक अमोल गोरे साहेब , यांनी गणेशोत्सव साजरा करण्यासंदर्भात विविध सुचनाची सविस्तर माहिती देउन सर्वांनी गणेश उत्सव शांततेत साजरा करावा. असे आवाहन केले ऑनलाइन परवानगी बाबत सिटीझन पोर्टलवर माहीती अपलोड करण्याबाबतची माहिती ठाणेदार आदिनाथ मोरे यांनी यावेळी दिली. यावेळी कोरोना काळातील गणेश मंडळ यांनी उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल प्रशस्तीपत्र देण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ठाणेदार आदिनाथ मोरे यांनी केले. पोलीस पाटील गुडदे, विजय सरोदे लांडकर, सा.शिक्षक दिपक आंधळे सर यांची समावेचीत भाषणे झाली. तालुका दंडाधिकारी काळे साहेब यांनी उपस्थितीना मार्गदर्शन केले व उपविभागीय अधिकारी केडगे साहेब यांनी विविध सुचना दिल्या. यावेळी सरपंच, तंटामुक्ती अध्यक्ष, पत्रकार, पंचक्रोशीतील नागरिक उपस्थित होते व कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जउळका पोलीस स्टेशनचे कर्मचारी काळदाते,कल्ले ,होमगार्ड, व इतर सर्व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. पोलीस उपनिरीक्षक अमोल गोरे यांनी सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन केले.