औरंगाबाद : (दीपक परेराव)पोलीस आयुक्तालयाच्या वतीने गणोशोत्सवपूर्वी प्रथेप्रमाणे पोलीस आयुक्तल्या मार्फत समनव्य बैठकीसाठी शहरातील आजी माजी लोकप्रतिनिधी, सार्वजनिक गणेश महासंघ ,गणेश मंडळ पदाधिकारी, राजकीय पक्षाचे नेते, आदींना आमंत्रीत केले जाते.

शहरात हजाराच्या जवळपास गणेश मंडळ आहेत. गणेशोत्सव दरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडू नये. त्यासह गणेश मंडळांना परवानगी घेताना कुठलीही अडचण येऊ नये तसेच सुरक्षेच्या दृष्टिकोनातून पोलीस विभाग गणेश मंडळाना सुचणा देण्यासाठी दरवर्षी बैठक घेण्यात येते.गणेश मंडळांना काही अडचणी असेल तर सांगा, २४ तासांत सोडवू, गणेशोत्सव शिस्तीत, आनंदात पार पाडण्यासाठी पोलिसांना सहकार्य करण्याचे आवाहन पोलीस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता यांनी केले.

पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला प्राधान्य देण्याचे आवाहन मनपा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी केले.

केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड म्हणाले, ईम्तियाज जलील हे औरंगाबादचे खासदार आहेत. मात्र,यापुढे छत्रपती संभाजीनगरचे खासदार आमच्या पक्षाचे होतील.

सहकार मंत्री अतुल सावे म्हणाले, मी मंत्री झालो त्यात खूश असून, मंत्री बनल्यावर बोलता येत नाही .इम्तियाज यांनी लोकसभेत विषय मांडावेत.

आमदार संजय शिरसाठ म्हणाले, गणेश मंडळांना क्रांती चौकातून मिरवणुकीत येऊ द्या. छावणीच्या दुसऱ्या दिवशीच्या मिरवणुकीला दोनता सांचा वेळ वाढवून द्या.

शिवसेना नेते चंद्रकांत खैरे म्हणाले, गणेशोत्सवात राजकारण बाजूला ठेवून गणेशोत्सव उत्साहात साजरा करा.

शांतता कमिटीच्या आयोजित बैठकीत राजकीय नेत्यांच्या मानपमानाचे नाट्य पाहायला मिळाले. मंचावर शिवसेना नेते आणि माजी खासदार चंद्रकांत खैरे यांचा अगोदर सत्कार करण्यात आला. यावेळी मंचावर उपस्थित असलेले शिंदे गटातील आमदार संजय शिरसाट चिडले. हे प्रोटोकॉल नुसार चुकीचे असल्याचे म्हणत खुर्चीवरून उठत कार्यक्रम सोडून शिरसाट निघाले होते.दरम्यान शेजारी बसलेल्या एम.आय.एम.चे खासदार इम्तियाज जलील यांनी त्यांचा हात धरून रोखले व त्या नंतर शिरसाट यांचा सत्कार करण्यात आला. पोलीस आयुक्तालायच्या वतीने आयोजित कार्यक्रमात झालेल्या नेत्यांच्या मानापणाची मात्र जोरदार चर्चा शहरात सुरु आहे.

संत एकनाथ रंगमंदिरात आयोजित या बैठकीत सर्व मान्यवरांचे स्वागत करण्यात येत होते. सध्याचे खासदार इम्तियाज जलील यांच्या नंतर शिवसेना नेते माजी खासदार चंद्रकांत खैरे यांचे स्वागतासाठी नाव पुकारण्यात आले. खैरेंचे नाव ऐकताच आमदार संजय शिरसाट संतापले खुर्चीवरून उठून त्यांनी नाराजी व्यक्त केली. प्रोटोकॉल नुसार माझा सत्कार खैरे यांच्या अगोदर करायला हवा असे म्हणत ते मंच सोडून जात होते. मात्र, त्याचवेळी त्यांच्या बाजूला बसलेले खासदार इम्तियाज जलील यांनी त्यांची समजूत काढत त्यांचा हात धरत खाली बसविले. पोलीस आयुक्तालयाने प्रोटोकॉल पाळला नसल्याबाबत उघड नाराजी व्यक्त करताच, खासदार जलील यांनी त्यांचा हात धरला. त्यांची समजुत काढून शांत केले.