चिंचवाड ता. करवीर येथील अल्पवयीन दोन मुलींचा हायस्कूल, क्लासेसच्या ठिकाणी वारंवार पाठलाग करून त्रास देणाऱ्या सोहम् सचिन कांबळे (वय १९, रा. आंबेडकर गल्ली, चिंचवाड, ता. करवीर) याला अटक केली असून, गडमुडशिंगी येथील अल्पवयीन मुलास गांधीनगर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

याबाबत रवींद्र मनोहर कांबळे (रा. चिंचवाड) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, सोहम् कांबळे व त्याचा अल्पवयीन साथीदार (रा. वायदंडे वसाहत, गडमुडशिंगी) हे दोघे मिळून मोटारसायकलवरून चिंचवाड येथील हायस्कूलच्या गेटवर व क्लासच्या ठिकाणी दोन मुलींचा पाठलाग करीत त्यांना त्रास देत होते. फिर्यादीने दिलेल्या तक्रारीनुसार, सोहम् कांबळे याला अटक करण्यात आली आहे. अधिक तपास साहाय्यक पोलीस निरीक्षक सत्यराज घुले करीत आहेत.