सोलापूर :- कॅमेरेच्या माध्यमातून राज्यकर्त्यांना वेगवेगळ्या अँगलमधून टिपून त्यांच्या चेहऱ्याचे सर्व कांगोरे लोकांसमोर आणण्याचे काम फोटोग्राफर करतात. एक फोटो हजारो शब्द सांगून जातो तसे वेगवेगळ्या अँगलने टिपलेले राजकारण्यांचे फोटो त्या माणसाची खरी ओळख सांगून जातो. असे मत शहर मध्येच्या आमदार प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केले.

शहरातील हॉटेल कामात येते जागतिक छायाचित्र दिनानिमित्त काँग्रेस डी ब्लॉकच्या वतीने छायाचित्रकारांचा सन्मान सोहळा आमदार प्रणिती शिंदे यांच्या हस्तेआयोजित करण्यात आला होता. यावेळी त्या बोलत होत्या.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी महापौर संजय हेमगडी हे होते. यावेळी देवाभाऊ गायकवाड, कुणाल गायकवाड, गणेश डोंगरे, व्यापारी संघटनेचे अध्यक्ष नंदकुमार पुजारी आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी कृष्णकांत चव्हाण , संदीप वाडेकर, अनिल भुदत्त, विशाल भांगे, रतन बनसोडे, नितीन खटके, प्रमोद हिप्परगी, आयुब कागदी ,अनिल कांबळे, वसीम आतार, मनोज हुलसूरे ,आदित्य केंगार ,यश वाघमोडे, यशवंत गुरव ,आदी छायाचित्रकार व व्हिडिओग्राफर यांचा सत्कार आमदार प्रणिती शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन देवभाऊ गायकवाड यांनी केले तर आभार कुणाल गायकवाड यांनी मानले.

फोटो ओळी

जागतिक छायाचित्र दिनानिमित्त काँग्रेस डी ब्लॉक च्या वतीने छायाचित्रकारांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता.यावेळी आमदार प्रणिती शिंदे यांनी स्वतः कॅमेरा मधून छायाचित्रकारांचा फोटो टिपला