यवतमाळ : किन्ही येथे बैल पोळा मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. तसेच येथील तान्हा पोळ्याला 24 वर्षांचा इतिहास आहे. सकाळी सात वाजता पासून चिमुकले मुले विविध प्रकारच्या वेषभूषेत आपल्या मातीच्या बैलांना सजवून स्पर्धेच्या ठिकाणी सहभागी झाले.आकर्षक बैलांचे निरीक्षण करून पाच स्पर्धकांना सरपंच, उपसरपंच यांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.जवळपास अर्धा किलोमीटर अंतरापर्यंत हा पोळा भरला होता. परिसरातील नागरिकांची गर्दी देखील पोळा बघण्यासाठी झाली होती. अशी माहिती आज दिनांक 27 ऑगस्ट शनिवार रोजी तान बैलपोळा समितीचे अध्यक्ष श्रीकृष्ण माघाडे व किन्ही येथील प्रथम नागरिक सरपंच ज्ञानेश्वर गोहाडे यांनीही माहिती दिली आहे
पटौदी इंटरप्राइजेज एवं अलगोजा रिसोर्ट - बूंदी
पटौदी इंटरप्राइजेज एवं अलगोजा रिसोर्ट कीऔर से बूंदी वासियों को दीपावली की हार्दिक बधाई व शुभकामनाएं