परभणी उपप्रादेशिक परिवहन कार्यालय परभणीकडून दुचाकी वाहनांसाठी एझेड ही नवीन मालीका सुरु करण्यात आली असून आकर्षक व राखीव क्रमांकासाठी दि. 29 ऑगस्ट 2022 पर्यंत कार्यालयीन वेळेत विहीत नमुन्यात पसंती क्रमांकाच्या डिमांड ड्राफ्टसह अर्ज सादर करावेत. एका पसंती क्रमांकासाठी एकापेक्षा अधिक अर्ज प्राप्त झाल्यास लिलाव पध्दतीने अर्ज निकाली काढून पसंती क्रमांक जारी करण्यात येईल. तसेच नोंदणी क्रमांक वितरकाच्या स्तरावर मान्यता होत असल्याने काही तांत्रिक अडचण उद्भवल्यास लिलाव मागील किंवा पुढील दिनांकास करण्याचे सर्व अधिकार उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे राहतील. याची सर्व अर्जदारांनी नोंद घ्यावी व जास्तीत जास्त वाहनधारकांनी पसंती क्रमांकासाठी अर्ज करावेत, असे परभणीचे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी अश्विनी स्वामी यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

Sponsored

महावीर कुल्फी सेन्टर - बूंदी

महावीर कुल्फी सेन्टर की और से बूंदी वासियों को दीपावली की हार्दिक बधाई व शुभकामनाएं