राजस्थान महाविद्यालय वाशीम येथील मराठीचे प्राध्यापक डॉ. विजय जाधव यांच्या 'अस्वस्थ तांडा' या कथासंग्रहातील 'कस्तुरी' नावाची कथा संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या बि.ए.भाग एकच्या 'शब्दगंध' या पुस्तकात समाविष्ट झाल्याबद्दल दिनांक २५ ऑगस्ट २०२२ला सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालय वाशीम येथे संपन्न झालेल्या 'श्रावणधारा' या कविसंमेलनात सुप्रसिद्ध साहित्यिक बाबाराव मुसळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. डॉ. जाधव यांनी आपल्या साहित्यातून तांड्यावरच्या व्यथा वेदनेचे, दु:खाचे, अंधश्रद्धेचे अतिशय ह्रदयस्पर्शी वर्णन केले असून त्यांच्या लेखणीला वाचकांना प्रभावीत करण्याची धार असल्याने त्यांचे कथासंग्रह वाचकांच्या पसंती पडत आहे. डॉ. विजय जाधव यांचे 'अस्वस्थ तांडा' व 'गोरवेणा' असे दोन कथा संग्रह ग्रंथाली प्रकाशन, मुंबई येथून प्रकाशित झाले असून त्यांच्या 'अस्वस्थ तांडा' या संग्रहास महाराष्ट्र शासनाचा, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानातर्फे, प्रथम प्रकाशनाकरीता दिला जाणारा ग.ल. ठोकळ हा अतिशय प्रतिष्ठेचा समजला जाणारा पारितोषिक प्राप्त झाले असून, स्व. सूर्यकांतदेवी पोटे राज्य पुरस्कार अमरावती, संत नामदेव राज्य पुरस्कार हिंगोली, शब्द राज्यस्तरीय पुरस्कार,चंद्रपूर आदी अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहे. त्याबद्दल सर्वत्र त्याचे अभिनंदन होत आहे.