मुलींची शैक्षणिक प्रगतीमध्ये गळतीचे प्रमाण जास्त असून वेगवेगळ्या अनेक कारणामुळे मुलींची शैक्षणिक सातत्य मध्ये गळतीचे प्रमाण जास्त आहे त्याचे निरसन होण्याच्या दृष्टिकोनातून लोकसभागातून तयार झालेली सायकल बँक योजना हे मुलींचे साक्षरतेचे, उच्च शिक्षित घेण्याचे प्रमाण वाढण्यासाठीचे योगदान अत्यंत महत्त्वाचे असल्याचे प्रतिपादन दक्षिण सोलापूर तालुक्याचे आमदार सुभाष देशमुख यांनी पंचायत समिती दक्षिण सोलापूर मार्फत लोकसभागातून एकत्रित केलेल्या सायकलीचे वाटपाचे शुभारंभ प्रसंगी आपल्या भावना व्यक्त केल्या .सोलापूर जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात आयोजित या कार्यक्रमात प्रसंगी सुभाष देशमुख यांनी आपले मनोगत व्यक्त केले .याप्रसंगी उपमुख्य कार्यकारी अधिकारी इशाधीन शेळकदे, साहा.प्रकल्प संचालक उमेशचंद्र कुलकर्णी आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक गटविकास अधिकारी बाळासाहेब वाघ तर सूत्रसंचालन विस्तार अधिकारी जयश्री सुतार तर आभार प्रदर्शन गटशिक्षण अधिकारी मल्हारी बनसोडे यांनी केले याप्रसंगी या कार्यक्रमास यशस्वीतेसाठी साह्य प्रशासन अधिकारी विवेक लिंगराज ,कैलास जींदे, भिमाशंकर वाले आदींनी परिश्रम घेतले.या कार्यक्रमास विशेष सहकार्य मुख्य लेखा व वित्त अधिकारी अजयसिह पवार, यांचे होते.या प्रसंगी शिक्षण विस्तार अधिकारी स्वाती स्वामी, गोदावरी राठोड उपस्थित होते.
पंचायत समिती दक्षिण सोलापूर लोकसभागातून सायकल बँक उपक्रमांतर्गत सायकल वाटपाचे शुभारंभ करताना आमदार सुभाष देशमुख उपमुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत इशादीन शेळकदे, गटविकास अधिकारी बाळासाहेब वाघ, गटशिक्षणाधिकारी मल्हारी बनसोडे , साह.प्रशासनाधिकारी विवेक लिंगराज ,जयश्री सुतार, स्वाती स्वामी ,गोदावरी राठोड डॉ. एस .पी .माने ,अंकुश काळे सचिन जाधव, दक्षिण सोलापूर शिक्षक वृंद व विद्यार्थिनी आदी उपस्थित होते.