सणसवाडी ता. शिरुर येथील एका पान टपरीतून चक्क एक लाख सत्तर हजार रुपयांचा गायछाप, सिगारेट सह आदी प्रकारचा माल चोरीला गेल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे अज्ञात चोरट्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
ओम धगाल - पूर्व प्रदेश कार्यकारिणी सदस्य भाजपा युवा मोर्चा
ओम धगाल की और से हिंडोली विधानसभा क्षेत्र एवं बूंदी जिले वासियों को रौशनी के त्यौहार दीपावली की हार्दिक बधाई व शुभकामनाएं
सणसवाडी ता. शिरुर येथे बलेंदर यादव यांची ओंकार पान शॉप नावाने पानटपरी असून २३ जुलै रोजी रात्रीच्या सुमारास यादव त्यांची पानटपरी बंद करून घरी गेले होते, दुसऱ्या दिवशी सकाळच्या सुमारास यादव हे त्यांची पान टपरी उघडण्यासाठी आले असता त्यांना टपरीचे कुलूप तुटले असल्याचे दिसून आले त्यामुळे त्यांनी आतमध्ये जात पाहणी केली असता अज्ञात व्यक्तीने टपरीचे कुलूप तोडून आतमध्ये प्रवेश करुन टपरीरील गायछाप तंबाकू, सिगारेट यांसह आदी साहित्य असा सुमारे एक लाख सत्तर हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला असल्याचे निदर्शनास आले, याबाबत बलेंदर राजकिशोर यादव वय ३२ वर्षे रा. सणसवाडी ता. शिरुर जि. पुणे यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असल्याने शिक्रापूर पोलिसांनी अज्ञात चोरट्यावर गुन्हे दाखल केले असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक रविकिरण जाधव हे करत आहे.