NAVI MUMBAI || तुर्भे जनता मार्केट मधील गोदमातून प्रतिबंधात्मक प्लास्टिक चा साठा केला जप्त.....
Anchor -: नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी नवी मुंबई प्लास्टिक मुक्त अभियानांतर्गत नवी मुंबई मधील सर्व मनपा वॉर्ड अधिकारी यांना प्रतिबंधात्मक प्लास्टिकचा साठा करणाऱ्या दुकान व गोदामांवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. याच अनुषंघाने काल तुर्भे वॉर्ड अधिकारी सुरेश येडवे यांनी तुर्भे जनता मार्केट सेक्टर 23 येथील भगवती जनरल स्टोरच्या गोदामामधुन प्रतिबंधात्मक प्लास्टिक व थर्माकोल चा साठा जप्त केला असून या गोदामाच्या मालकास पाच हजारांचा दंड ठोठावला.....