मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी

Sponsored

पटौदी इंटरप्राइजेज एवं अलगोजा रिसोर्ट - बूंदी

पटौदी इंटरप्राइजेज एवं अलगोजा रिसोर्ट कीऔर से बूंदी वासियों को दीपावली की हार्दिक बधाई व शुभकामनाएं

सोलापूर - आपल्या गावातील ग्रामस्थांचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी पिण्यासाठी स्वच्छ व शुद्ध पाण्याचा पुरवठा आवश्यक आहे.त्यासाठी जिल्ह्यातील पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोतांचे पाणी नमुने जैविक तपासणी व टिसीएल पावडरच्या नमुन्याची तपासणी येत्या आॕक्टोबर २०२२ अखेर पूर्ण करुन घ्यावी असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी केले.

जिल्हा परिषदेमध्ये पाणी गुणवत्ता सनियंत्रण व सर्वेक्षण कार्यक्रमांतर्गत आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय पाणी गुणवत्ता समितीच्या बैठकीमध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी हे बोलत होते.यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी ( ग्रा.पं/पाणी व स्वच्छता ) इशाधीन शेळकंदे , जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.शितलकुमार जाधव , ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता दिपक कोळी , वरिष्ठ भूवैज्ञानिक मुश्ताक शेख , माढ्याचे गट विकास अधिकारी डॉ.संताजी पाटील , मोहोळचे गट विकास अधिकारी आनंदकुमार मिरगणे ,करमाळ्याचे गट विकास अधिकारी मनोज राऊत , अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.दुधभाते , कनिष्ठ भूवैज्ञानिक एस.एल.निंबाळकर , उपअभियंता ( यांत्रिकी ) सुर्यवंशी, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सचिन जाधव , पाणी गुणवत्ता सल्लागार दिपाली व्हटे , संवाद सल्लागार सचिन सोनवणे , मनुष्यबळ विकास सल्लागार शंकर बंडगर , यशवंती धत्तुरे , अर्चना कणकी , महादेव शिंदे आदी उपस्थित होते.सदर बैठकीमध्ये 

जिल्ह्यातील सार्वजनिक पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोतांची माहिती अद्ययावत करणे , स्वच्छता सर्वेक्षण करणे , अयोग्य स्त्रोतांची यादी करणे , जिल्ह्यातील पाणी गुणवत्तेविषयीची माहिती केंद्र शासनाच्या संकेत स्थळावर आॕनलाइन करणे आदी विषयाबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

जिल्ह्यातील प्रत्येक गावात प्रशिक्षण देण्यात आलेल्या ५ सक्रिय महिलांनी एफटीकेच्या माध्यमातून पिण्याच्या पाणी नमुने तपासणी करण्यात आलेली माहिती सर्व तालुक्यांनी शासनाच्या संकेत स्थळावर त्वरित करण्यात यावी अशी सुचना उपमुख्य कार्यकारी अधिकारी ( ग्रा.पं/पाणी व स्वच्छता ) इशाधीन शेळकंदे यांनी केली.

जिल्ह्यातील सर्व तालुका वैद्यकीय अधिकारी , प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी यांनी प्रत्येक गावातील पाणी नमुन्यांची जैविक तपासणी करण्यासाठी सहकार्य करावे असे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.शितलकुमार जाधव यांनी सांगितले.