यवतमाळ : वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एका विद्यार्थ्याची रॅगिंग करण्यात आल्याच्या घटनेने खळबळ उडाली आहे. चौकशी समितीने सर्व विद्यार्थ्यांची बयाणे  नोंदविली असून, या अहवालाची प्रतीक्षा आहे.शल्य चिकित्सा विभागाच्या एका विद्यार्थ्याचा पाच सिनिअर डॉक्टरांकडून शारीरिक व मानसिक छळ केला जात असल्याची तक्रार अधिष्ठाता डॉ. मिलिंद फुलपाटील यांच्याकडे आली. त्यावरून त्यांनी चार डॉक्टरांची चौकशी समिती गठित केली. या समितीने मेडीकलच्या विद्यार्थ्यांना बयाण देण्यासाठी पाचारण केले होते.

मेडीकल प्रशासनाने ही घटना गांभीर्याने घेतली आहे. डॉक्टरांच्या चौकशी समितीने सर्व विद्यार्थ्यांची बयाणे नोंदविली आहे. अजून अहवाल आला नाही. त्यानुसारच पुढील कार्यवाही केली जाईल, असे वैद्यकीय अधीक्षक  डॉ. सुरेंद्र भुयार यांनी सांगितले.