दरेगांव ता २३- चांदवड तालुक्यातील दरेगांव येथे दिनांक२३ ला सकाळी ८वाजता ग्रामसभा वादळी व आरोप प्रत्यारोप करून सपन्न झाली.
ओम धगाल - पूर्व प्रदेश कार्यकारिणी सदस्य भाजपा युवा मोर्चा
ओम धगाल की और से हिंडोली विधानसभा क्षेत्र एवं बूंदी जिले वासियों को रौशनी के त्यौहार दीपावली की हार्दिक बधाई व शुभकामनाएं
सर्वात महत्वाचा मुद्दा घरकुलाचा ग्रामस्थांनी उपस्थित केला तो असा २०१६ मधील १४० घरकुल मंजूर करण्यात आले असता त्या १४० मंजुर घरकुलापैकी ४७ मंजूर घरकुल चालु ग्रामपंचायतीने नावे कमी करुन नवीन नावे टाकुन घरकुलाचे नावे वाढवण्यात आले. असा आरोप करण्यात आला. स्टेट लाईट गावातील व ईंदिरानगर भागातील बंद असतात. ग्रामपंचायत कर्मचारी ग्रामपंचायतीचे काम व्यवस्थीत करत नाहि. आयुर्वेदीक दवाखान्याचे अधिकारी वेळेवर कामावर हजर राहत नाही. व वैद्यकीय निवास्थान असताना या ठिकाणी कुणीही राहत नाही. त्याना इतर गावामध्ये कामावर जावे लागत असल्यास त्याची माहिती देण्यात यावी. सबस्टेशन खंडेराव मंदिराजवळ मंजूर असताना सबस्टेशनचे काम का नाही होत.अंगण वाडी व आशा सेविकांची माहिती घेण्यात आली.१००टक्के हागणदरी मुक्त गाव असताना प्रत्यक्षात तसे नाही. आजही ग्रामस्थ सौचालयासाठी उघड्यावर जातात. असाहि आरोप करण्यात आला.
( ग्रामसभा १५ ऑगस्ट रोजी होणारी ती आज २३ ऑगस्टला घेण्यात आली. ग्रामसभा शांततेत सुरुवातीला चालु झाली व नंतर आरोप प्रत्यारोप होउन गोंधळ निर्माण झाला.)
ग्रामपंचायतीने ग्रामस्थांच्या मुद्दे पोसडींगवर घेण्यात आले. ग्रामसेवकांनी १४व्या वित्ताचे झालेले कामाचे व १५व्या वित्त कामाचे वाचन केले. मंजुर होणारे कामाचे माहिती देण्यात आली. गावासाठी शेततळे ,सबस्टेश काम लवकरात चालु करण्यात येतील. जिल्हा परीषद लाईट बिलाचे मुद्दा घेण्यात आला.साहाय्य कृषीधिकारी फळबागेची लागवडची माहिती दिली.
फोटो- दरेगांव ता.चांदवड येथे ग्रामसभेत ग्रामस्थांच्या प्रश्नांनाची माहिती देताना ग्रामसेवक डांगरे व ग्रामस्थ