नांदेड (आप्पासाहेब गोरे) राज्यातील दिशाहीन होत चाललेले शैक्षणिक धोरण यामुळे शिक्षकांवर शैक्षणिक कार्याशिवाय वाढलेला अतिरिक्त भार, जुनी पेन्शन योजना, शिक्षकांची वेठ बिगारी थांबवून विनाअनुदानित शिक्षकांना 100% पगार यासह शिक्षकांच्या इतर प्रलंबित मागण्यासाठी नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चाचे आयोजन मराठवाडा शिक्षक संघाच्या वतीने करण्यात आले आहे.

 व्हाईस : या मोर्चा च्या संदर्भाने नायगांव तालुका शिक्षक संघाच्या पदाधिकारी व सदस्य यांची विशेष बैठक शहरातील संभाजी नगर येथील तालुका संघाचे सचिव कोंडावार यांचे निवासस्थानी घेण्यात आली होती. या बैठकीत. 28 ऑगस्ट रोज रविवारी महात्मा फुले पुतळा आय.टी.या. चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय निघणाऱ्या या मोर्चात तालुक्यातील सर्वच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी मोठ्या संख्येने आपला सहभाग स्वयंस्फूर्तीने नोंदवून नायगाव तालुक्यातील सर्वच शिक्षक बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन नायगाव तालुका मराठवाडा शिक्षक संघाच्या वतीने करण्यात आले. यावेळी ई. डी. पटोदेकर , तालुकाध्यक्ष वसंत माने , तालुका सचिव लक्ष्मण कोंडावार , तालुका कार्याध्यक्ष ई. एस. कल्याण , तालुका संघटक नागेश कल्याण , एस.एन.कांबळे , नागोराव तिपलवाड आदीं प्रमुख पदाधिकारी यांच्यासह तालुक्यातील इतर शिक्षक यांची मोठी उपस्थिती होते