यवतमाळ : येथील दत्त चौक परिसरातील अमराईपुऱ्यात टोळीयूद्घाची घटना घडली होती. याप्रकरणी अवधूतवाडी पोलिसांनी चौघांना अटक केली आहे. त्यामुळे आरोपींची संख्या पाच झाली आहे.

सोनू मुदस्सर, सच्चू यादव, रवी संघानी, अभी मुराब सर्व रा. यवतमाळ अशी अटकेतील आरोपींची नावे आहे. टोळीयुद्घात दोन्ही गटाकडून चाकू, तलवारीने हल्ले करण्यात आले होते. यामध्ये दोन्ही टोळीतील प्रत्येकी एक सदस्य गंभीर जखमी झाला. अवधूतवाडी पोलिसांनी दोन्ही गटाच्या प्राप्त तक्रारीनंतर परस्परविरोधी गुन्हे नोंद केले. गुन्हे दाखल होताच आरोपी पसार झाले होते. दरम्यान सोमवारी मिंट्या ठाकूरला पोलिसांनी अटक केली होती. त्यामुळे अटक आरोपींची संख्या पाच झाली आहे.