बालानगर येथील ग्रामसभा ठरली वादळी
पटौदी इंटरप्राइजेज एवं अलगोजा रिसोर्ट - बूंदी
पटौदी इंटरप्राइजेज एवं अलगोजा रिसोर्ट कीऔर से बूंदी वासियों को दीपावली की हार्दिक बधाई व शुभकामनाएं
बालानगर-ग्रुप ग्रामपंचायत येथे 15 ऑगस्ट रोजी ग्रामसभा न घेता दिनांक 23 रोजी ग्रामसभा घेण्यात आली व मागील रोजगार हमी योजनेच्या कृती आराखड्यास मान्यता देणे व नवीन कृती आराखडा तयार करण्यासाठी ग्रामसभेच्या सरपंच वंदना भालेकर यांच्या अध्यक्षतेखाली आयोजन करण्यात आले होते.यावेळी उपस्थित नागरिकांनी मागील खर्चाचा लेखाजोखा वाचून दाखवा व केलेल्या कामाची यादी प्रसिद्ध करावी अशी मागणी केली यावेळी काही कामांना अनावश्यक वाढीव खर्च केल्याचे लक्षात आल्याने ग्रामस्थांनी सरपंच ग्रामपंचायत सदस्य ग्रामविकास अधिकारी यांना चांगलेच धारेवर धरले होते; 52 लाखाच्या निधीमध्ये गावाचा काय विकास झाला कामांमध्ये भ्रष्टाचार झाल्याचे नागरिक चर्चा करत होते; यावेळी काही नागरिकांना स्वच्छालय बांधकामाचे पैसे न मिळाल्याने त्यांच्याशी विचारणा केली असता ग्रामपंचायतचे दप्तर बदली होऊन गेलेले ग्रामसेवक त्यांच्याकडेच आहे ते एक वर्षापासून देण्यास टाळाटाळ करत असल्याचे सांगण्यात आले यावेळी वैयक्तिक सिंचन विहीर गाय गोठा कुक्कुटपालन शेड शेवगा लागवड पादन रस्ते या कामाच्या नवीन याद्या तयार करण्यात आल्या या वेळी गावातील नागरिक आदी उपस्थित होते.