बीड (प्रतिनिधी) एमकेसीएल या संस्थेच्या वर्धापन दिनानिमित्त मुंबई येथील नेहरू सेंटरमध्ये संपन्न कार्यक्रमांमध्ये एम.एस.सी.आय.टी. व क्लिक बिजनेस यातील उत्कृष्ट कार्यासाठी बेस्ट परफॉर्मन्स पुरस्कार चौसाळा येथील माऊली कंप्युटर चौसाळा संचालक दत्तात्रय येडे यांना प्रदान करण्यात आला. 20 ऑगस्ट 2022 रोजी मुंबई येथे आयोजित वर्धापन दिनाच्या कार्यक्रमानिमित्त बेस्ट परफॉर्मन्स हा पुरस्कार एमकेसीएलच्या मॅनेजिंग डायरेक्टर विना कामत यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.याप्रसंगी राजीव गांधी विज्ञान आणि तंत्रज्ञान आयोगाचे अध्यक्ष तथा अणुऊर्जा आयोगाचे माजी अध्यक्ष डॉ.अनिल काकोडकर,प्रा.जे.बी.जोशी ( माजी संचालक,इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी मुंबई,डॉ.अनंत सरदेशमुख (एम.सी.सी.आय.ए. चे माजी महासंचालक ),दक्षिण आशिया जैवतंत्रज्ञान केंद्राचे अध्यक्ष डॉ. चारुदत्त मायी,ए.एफ.सी.लिमिटेडचे कार्यकारी मंडळ सदस्य ए.बी.एन.ई. ( बुर्किना फासो) आय.एस.ए.ए.ए (युएसए),अध्यक्ष इंडियन सोसायटी फॉर कॉटनचे अध्यक्ष आदींची उपस्थिती होती.माऊली कंप्युटरचे संचालक दत्तात्रय येडे यांनी गेल्या अनेक वर्षापासून होतकरू, गरीब विद्यार्थ्यांना संगणकाचे अद्यावत ज्ञान एमकेसीएलच्या माध्यमातून उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांना हा पुरस्कार मिळाला आहे हा पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल बीड जिल्ह्यातून मित्र परिवाराच्या वतीने त्यांचे हार्दिक अभिनंदन होत आहे.