कायदा हा समाजाचा कणा असतो - न्यायाधीश व्हि.डी.शिरसे

     ममता विद्यालयाच्या विद्यार्थ्यांची भरली पोलीस स्टेशन मध्ये शाळा.

 पालम(प्रतिनिधी) येथे विधी सेवा व अभिवक्ता संघ व पोलीस स्टेशन पालम यांच्या संयुक्त विद्यमाने मोटार वाहन कायदा विषयक मार्गदर्शन शिबिर संपन्न झाले .

दैनंदिन होत असलेले अपघात व त्यात झालेली वाढ याविषयी जनसामान्यात जागरूकता यावी यासाठी व होणाऱ्या अपघातांना कसे रोगथाम करता येईल यासाठी मोटार वाहन वाहतूक कायद्याचे सर्वसामान्यांना माहिती व्हावी यासाठी पोलीस स्टेशन पालम येथे मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले. यावेळी ममता विद्यालयाच्या पंधराशे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले यावेळी पोलीस स्टेशनला शाळा भरण्याचे स्वरूप प्राप्त झाले होते या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पालम येथील मा.न्यायाधीश व्ही.डी. शिरसे ह्या होत्या तर प्रमुख पाहुणे म्हणून पालम पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रदीप काकडे, महामार्ग विभागाच्या सहायक पोलीस निरीक्षक अर्चना वरकुडे, मो. वा. स.निरक्षक विकास नाईकवाडी,मो.वा.स.नि.प्रशांत मोरे व अभिव्यक्ता संघाचे एडवोकेट बी बी दुधाटे,पि बी मुटाळ , एस.आर.रोकडे, एॅड. खतीब, ममता शाळेचे मुख्याध्यापक शिवाजीराव अंभोरे व शिक्षक वृंद विद्यार्थी इत्यादी उपस्थित होते. या मार्गदर्शन शिबिराची माहिती देताना पालम पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रदीप काकडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले की हल्ली विद्यार्थी गाडी चालवत असताना अतिशय वेगात चालवतो पुढील वाहनास कट मारणे किंवा लायसन्स नसताना चालवणं आणि त्यातल्या त्यात अल्पवयीन विद्यार्थी तसेच नियम तोडून गाडी चालवणं आणि त्यामुळे होणारे अपघात अशा गोष्टींना फक्त अल्पवयीन चालक नियम तोडत नाहीत तर त्यांना गाडी चालवण्यासाठी देणारे त्यांचे पालकही तेवढे जबाबदार असतात. त्यांनीही विद्यार्थ्याला गाडी देत असताना त्याच्या वयाचा लायसन्सचा नियमाचा या सर्व गोष्टींचा विचार करून गाडी चालवण्यासाठी द्यावी जेणेकरून नियमाचे उल्लंघन होणार नाही व असे अपघात होणार नाहीत असे ते म्हणाले. बऱ्याच वेळा असं होतं की प्रशासनात वेगवेगळे विभाग आहेत दारूबंदी विभाग आहे ,परिवहन विभाग आहे ,महामार्ग विभाग आहे परंतु कोणत्याही घटनेत पोलीस प्रशासनाला जबाबदार धरल्या जाते असे का. प्रत्येक विभागाला त्यांचा त्यांचा कर्मचारी फौज फाटा आहे मग कोणत्याही गोष्टी बाबतीत पोलिसांच्या डोक्यावर खापर का फोडल्या जाते असे होता कामा नये प्रत्येकाने आपापली जबाबदारी घेतली पाहिजे असे त्यांनी आव्हान या प्रसंगी केले. 

कार्यक्रमात उपस्थित

 त्यांना मार्गदर्शन करताना माननीय न्यायाधीश शिरसे मॅडम म्हणाल्या की हा कार्यक्रम विधी सेवा अभिव्यक्त संघ व पोलीस स्टेशन पालम यांच्या संयुक्त विद्यमाने व तसेच प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश परभणी यांच्या आदेशान्वये व मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला आहे.

मोटार वाहन कायदा याविषयी त्या बोलत असताना म्हणाल्या की हा कायदा जुना जरी असला तरी या कायद्यात 1919 ला मोठ्या प्रमाणात बदल करण्यात आले माननीय सुप्रीम कोर्टाने या कायद्याच्या जनजागृतीसाठी कायदेविषयक प्रणाली राबवली आहे ती म्हणजे अशा कायद्याविषयी जनसामान्याला माहिती व्हावी यासाठी शिबिराचे आयोजन आणि त्याचाच भाग म्हणून या कायद्याची शालेय जीवना मध्ये असतानाच माहिती व्हावी यासाठी विद्यार्थ्यांनाही त्याची माहिती व्हावी कारण विद्यार्थी हे उद्याचे सुजाण नागरिक आहेत त्यांना कायद्याची माहिती व्हावी यासाठी अशा शिबिरांचे आयोजन करण्यात येत असते आम्ही विद्यार्थी दसेद होतो त्यावेळी आम्हाला कायदा म्हणजे काय अजिबात याची जाणीव नव्हती परंतु दिवसेंदिवस समाज जीवनात होणाऱ्या अघटित घटना व कायद्याची पायमल्ली अशा घटना घडू नये यासाठी जनसामान्यांना विशेषता विद्यार्थी दशेपासूनच कायदा माहिती व्हावा यासाठी असे शिबिरांची आयोजन करण्यात येत असते आजचे विद्यार्थी भाग्यवान आहेत त्यांना कायद्याविषयी माहिती शालेय जीवनातच मिळत आहे तेव्हा उद्याचे हे चांगले सुजाण नागरिक कर्तव्यदक्ष नागरिक होतील असाही आशावाद त्यांनी व्यक्त केला. कायदा म्हटले की पूर्वी लोकांना भीती वाटायची नको कोर्टाची पायरी चढायला असा सर्वसामान्यांचा समज असायचा परंतु कायदा हे आपल्यासाठी व आपल्या परिजनांसाठीच्या सुरक्षेसाठी असतो त्यामुळे कायद्याची माहिती असायलाच पाहिजे कारण कायदा हा समाजाचा कणा आहे कणा ताठ आहे तोपर्यंत जीवन आहे म्हणून कायदा ताट असल्यावर समाजामध्ये सुव्यवस्था अबाधित राहते म्हणून प्रत्येकाने कायद्याविषयी भीती न बाळगता काटेकोरपणे कायदा पाळायला पाहिजे नियम पाळायला पाहिजे. कायदा खूप अथांग आहे त्याच्याविषयी एखाद्या कार्यक्रमातून पूर्ण माहिती देणे शक्य नाही परंतु जनसामान्यांना कायद्याची प्राथमिक माहिती देणे ही काळाची गरज आहे म्हणून न्याय आपल्या दारी येत आहे असेही ते पुढे म्हणाल्या .महामार्ग विभागाच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीमती अर्चना वरकुडे मॅडम यांनी वाहनाच्या नियमाविषयी मोटर सायकल अपघातात मृत्यूचे प्रमाण जास्त असल्याचे सांगितले त्यातही अल्पवयीन व तीस वर्षातील नवयुवक मुलांचे प्रमाण जास्त आहे अपघाताचे कारण ड्रिंक करून चालवणे चुकीच्या पद्धतीने भरधाव वेगाने चालवणे हेल्मेट न घालता वाहन चालवणे वाहतुकीचे नियम न पाळणे या कारणांचा समावेश आहे हेल्मेट न घातल्यामुळे आपण तीन-तीन वेळा दंड भरतो परंतु 350 रुपये किमतीचे हेल्मेट घालत नाही आपण वाहन चालवत असताना वाहतूक नियमांचे पालन करत नसल्यामुळे जीवघेण्या अपघात घडत असतात आपण फक्त आपला जीव धोक्यात घालत नाही तर इतरांच्या जीवाला सुद्धा धोक्यात टाकतो असे त्या पुढे म्हणाल्या. म्हणून मोटार वाहन नियमांचे सर्वांनी पालन करावे असे आवाहनही त्यांनी केले . अपघात ग्रस्तांना वेळेवर मदत मिळावी म्हणून मृत्युंजय दूत योजना कार्यान्वित करणार असल्याचे त्या म्हणाल्या. स.नि.मो.वा. नाईकवाडी परभणी यांनीही मोटार वाहन नियमाविषयी विस्तृत अशी मार्गदर्शन शिबिरामध्ये केले तसेच वकील संघाचे एँड. दुधाटे ,एँड. खतीब यांनीही यावेळी आपले मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाला आवर्जून पालम पत्रकार संघाचे सर्व अध्यक्ष, उपाध्यक्ष,सचिव ,सल्लागार तसेच सर्व सन्माननीय सदस्य उपस्थित होते.शेवटी पालम पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री. प्रदीप काकडे यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले तर नंतर परिवहन विभागाकडून सर्वांना प्रतिज्ञा देण्यात येऊन सामूहिक राष्ट्रगीता नंतर कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स. पो. नि. मारुती कारवार यांनी केले तर कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी पोलीस स्टेशनच्या सर्व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.