साबळेला एक कोटी अनुदान देण्याची आ.धस यांची निवेदनाद्वारे मागणी

आष्टी (प्रतिनिधी) बीड जिल्ह्यामधील आष्टी तालुक्याचा सुपुत्र आंतरराष्ट्रीय धावपटू अविनाश साबळे यांनी बर्मिंगहॅम येथील राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०२२ मध्ये स्टीपलचेस या क्रीडा प्रकारात 3000 मीटर अंतर ८.११.२० मिनिटात आपली शर्यत पूर्ण करत रौप्य पदक पटकावून आकाशाला गवासणी घालत देशासह महाराष्ट्राचे नाव उंचावलेले आहे.अत्यंत गरीब कुटुंबात जन्मलेल्या अविनाश चे आई वडील वीटभट्टी कामगार असून हलाकीच्या परिस्थितीमध्ये त्यांनी अविनाशला घडवलेले आहे.आंतरराष्ट्रीय स्तरावर पदक मिळवणाऱ्या खेळाडूंना इतर राज्याप्रमाणे महाराष्ट्र शासना कडूनही आर्थिक मदत केली जावी जेणेकरून या खेळाडूला पुढील स्पर्धेच्या तयारी करिता आर्थिक मदत होईल तसेच इतर खेळाडूंना प्रोत्साहन मिळेल.

यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उपमुख्यमंञी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आ.सुरेश धस यांनी अविनाश साबळे याला राज्यशासना कडून प्रोत्साहन पर १ कोटी रुपयांचे अर्थिक अनुदान देण्याची मागणी केली.