फुलंब्री येथील गोलआंबा वस्ती लगत बांधण्यात आलेल्या कोल्हापुरी बंधार-याचे चाळीस लोंखडी दरवाजे अज्ञात चोरट्यांनी शुक्रवार (दि.१९) रात्री चोरुन नेले या प्रकरणी सोमवारी एका शेतकऱ्याने फुलंब्री ठाण्यात तक्रार दिली आहे.

     येथील गोलअंबा वस्तीलगत २००७ मध्ये तत्कालीन जिल्हा परिषद अध्यक्ष राजेंद्र ठोंबरे यांच्या पुढाकारातुन फुलमस्ता नदीवर कोल्हापुरी बांधणारा बांधण्यात आला होता. या बंधाऱ्यात दरवर्षी मोठ्या प्रमाणात पाणी साठवले जाते. साठवलेल्या पाण्यामुळे पावसाळा संपल्यानंतर परिसरातील विहिरींची पाणीपातळी सुमारे दोन चार महिने चांगलीच टिकुन राहते. या बंधाऱ्यावर जिल्हा परिषदेच्या माध्यमातून लाखो खर्च करण्यात आलेले. या कोल्हापुरी बंधाऱ्यासाठी एकुण ६५ लोखंडी दरवाजे बसविण्यात आलेले आहे. पावसाळ्याच्या शेवटी -शेवटी परिसरातील शेतकरीच सदर दरवाजे बसुन वाहुन जाणारे पाणी अडविण्यासाठी या दरवाज्याचा वापर करतात. परंतु या कोल्हापुरी बंधाऱ्याचे शुक्रवारी मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी चाळीस दरवाजे पळवुन नेले आहे. याप्रकरणी शेतकरी पंढरीनाथ नागरे यांनी सोमवारी फुलंब्री पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.