भारतीय स्वतंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त क्रिडा आणि युवा सेवा संचालनालय, महाराष्ट्र शासन व रयान स्पोर्ट्स अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 21ऑगस्ट व 22 ऑगस्ट 2022 रोजी बालेवाडी क्रिडा संकुल, पुणे येथे 10 वर्षं वयोगट मुलांसाठी फुटबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेमधे एकुण 22 संघ सहभागी झाले होते. अंतिम सामना रायजिंग पुणे व लोकसेवा इंग्लिश मिडीयम स्कूल यांच्यामधे झाला.व लोकसेवा स्कूल च्या संघाने विजेतेपद मिळवले. वापा वल्लीम या लोकसेवा स्कूलच्या विद्यार्थ्यांला सर्वोत्तम खेळाडू पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. शाळेचे क्रिडा शिक्षक  गणेश कनसे व  योगेश कानडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. 

लोकसेवा संस्थेचे संस्थापक दिपक पायगुडे,संचालक प्रा.नरहरी पाटील, लोकसेवा इंग्लिश मिडीयम स्कूलचे प्राचार्य डेनसिंग सर, टेन टि इंटरनॅशनल स्कूलचे प्राचार्य शोफेमाॅन सर, लोकसेवा मुलींची सैनिकी शाळा च्या प्राचार्यां श्रीमती लक्ष्मी कुलकर्णी, नेताजी सुभाषचंद्र बोस बाॅईज मिलिटरी स्कूलचे प्राचार्य अमर क्षीरसागर सर यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. यावेळी संस्थेचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.