यवतमाळ : घाटंजी येथील सोनू मंगलम येथे माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज भैय्या अहिर यांच्या अध्यक्षतेखाली बूथ सशक्तीकरण अभियाना अंतर्गत

 भाजपा पदाधिकारी शक्ती केंद्रप्रमुख बुथ प्रमुख व कार्यकर्ते यांची आढावा बैठक पार पडली. याप्रसंगी श्री सुरेश डहाके यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना केली प्रस्तावना केली तर अभीजीत झाडे यांनी बुथ सशक्तिकरण अभियाना विषयी माहिती दिली कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री हंसराज भैय्या अहिर यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात बुथ रचनेचे महत्त्व समजावून सांगितले. भारतीय जनता पार्टी 2 जागेवरून 303 खासदारापर्यंत पोहोचताना बूथ स्तरावरील कार्यकर्त्यांचा महत्त्वाचा वाटा आहे व आपण सुद्धा निवडणुकीत निवडून येताना मजबूत बुथ असल्याचाच फायदा झाला याची शाश्वती दिली. या अभियानांतर्गत आपल्याला प्रत्येक बुथ मजबूत करून भाजपाला अजिंक्य करायचे आहे असा प्रण घ्यायला हवा असे सांगितले. या यावेळी भाजपा ओबीसी मोर्चा जिल्हाध्यक्ष श्री सुनील समदुरकर भाजपा व्हीजेएनटी जिल्हाध्यक्ष श्री मोहन जाधव भाजपा तालुका अध्यक्ष श्री सुरेश डहाके भाजपा ज्येष्ठ नेते श्री मधुसूदन चोपडे जिल्हा उपाध्यक्ष बिपीन राठोड जिल्हा सोशल मीडिया प्रमुख अभीजीत झाडे शहराध्यक्ष राम खांडरे रामसिंग राठोड दत्ताजी कोंडेकर भाजपा तालुका सरचिटणीस नंदकिशोर डंभारे दिलीप पवार अनुप अप्पनवार माजी तालुकाध्यक्ष गुड्डू शुक्ला माजी नगराध्यक्ष नामपेल्लीवार सर BJYM तालुकाध्यक्ष चेतन जाधव भाजपा आदिवासी आघाडी विधानसभा प्रमुख स्वप्निल मंगळे देवीदास आडे भाजपा महिला मोर्चा शहराध्यक्ष रीना धनरे भाजयुमो शहराध्यक्ष भावेश सुचक सरचिटणीस मनोज हामंद सोशल मीडिया विधानसभा संयोजक गोपाल काळे व इतर अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.