यवतमाळ : महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद महिला परीचर महासंघाचे बेमुदत धरणे आंदोलन मूबंई आझाद मैदानावर सूरू आहे. आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांचे बरोबर शिष्टमंडळाची चर्चा झाली व मागण्या मान्य करायचे आश्वासन दिले. परंतू आश्वासन देऊन दिशाभूल केली आहे. सविस्तर 18 मिनिट चर्चा केली व नेहमी महिला परीचरानंचे प्रस्ताव फेटाळून लावल्या जातोय. जो पर्यंत मुख्यमंत्री भेट देत नाही तोपर्यंत धरणे आंदोलन सूरू राहणार आहे,अशी माहिती राज्य अध्यक्षा मंगला मेश्राम यांनी दिली.
यवतमाळच्या जिल्हा परिषद महिला परीचर महासंघाचे धरणे आंदोलन; आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्याशी झालेली चर्चा फिस्कटली
