‘कहते है हमको प्यार से इंडियावाले’, ‘भारत हमको जान से प्यारा है’ म्हणत ‘देश रंगीला रंगीला’ सारख्या देशभक्तीपर गीतांवर विद्यार्थ्यांनी बहारदार नृत्य सादर केले. या नृत्यांनी प्रत्येकाच्या मनात देशभक्तीची ज्योत जागवली. कारंजा नगर पालिके द्वारे प्रस्तुत विदर्भ स्तरीय देशभक्ती नृत्य व गीत गायन स्पर्धा दि. 21 ऑगस्ट रोजी स्थानिक महेश भवन येथे उत्साहात संपन्न झाली.आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तहसीलदार धीरज मांजरे तर प्रमुख उपस्थिती मध्ये ब्लू चिप कॉन्व्हेन्ट चे अध्यक्ष अशोक इन्नानी, गटशिक्षणाधिकारी श्रीकांत माने, पोलीस उपनिरीक्षक वाघमोडे, सुधाकर जाधव, भाजपा शहराध्यक्ष ललित चांडक, रवींद्र शहाकार, प्रा.सी.पी.शेकुवाले, मदन देवडा, प्रशांत गायधनी, प्रा.खूपसे, प्रा.पवार यांच्या सह मुख्याधिकारी दादाराव डोल्हारकर उपस्थित होते. यावेळी स्पर्धकांनी उपस्थितांची मने जिंकून कार्यक्रमात रंगत आणली. दरम्यान गीत गायन स्पर्धेत प्रथम विजेता, हाफीज खान कारंजा,अनुराग राठोड कारंजा, तर द्वितीय विजेता अब्दुल फईम, अकोला, सारा मुंदे, कारंजा तसेच तृतीय विजेता शोएब खान, अकोला ,भक्ती पिसे, कारंजा, प्रोत्साहन पर बक्षीस कुर्बान शहा, जामनेर,आरिफ चौधरी, कारंजा पुष्पराज पवार, नाशिक यांनी प्राप्त केले. समूह नृत्य स्पर्धेत संमती ज्ञान मंदिर, कारंजा, ब्लू चिप कॉन्व्हेन्ट, कारंजा, गोविंद न्यू इंग्लिश स्कूल कारंजा, विद्याभारती हायस्कूल,कारंजा, विश्वभारती विद्यालय, कारंजा, एम.आर. नागवानी स्कूल कारंजा, संमती ज्ञान मंदिर कारंजा, झिल इंटरनॅशनल स्कूल कारंजा, विद्यारंभ विद्यालय कारंजा आदि क्रमशः विजेते ठरले आहे. तथा ईरो फिल्म चे प्रोड्युसर इम्तियाज भाई लुलानिया यांनी एक हजार रुपयांचे नगद बक्षीस विद्याभारती शाळेचे विद्यार्थ्यांना दिले कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता आरोग्य निरीक्षक विनय वानखडे, कार्यालयीन अधीक्षक संजय नेरकर, राहुल सावंत प्रवीण सूर्यवंशी, सुधीर चकोर, संतोष जामनिक, मनोज सावते, शरद काळे, संघरत्न नरवाडे, राजू मनवर, विजय सावते,गोपाल गाडगे, रामदास काळबांडे तसेच नगर परिषद अधिकारी व कर्मचारी यांनी पुढाकार घेतला. कार्यक्रमाचे संचालन गोपाल खाडे व प्रणिता दसरे यांनी केले तर आभार राहुल सावंत यांनी मानले.