डावा कालव्यावरील पूल नादुरुस्त असल्यामुळे नागरिकांचे हाल.
पाचोड प्रतिनिधी/
पैठणच्या नाथसागरातून शेतीसाठी जाणारा डाव्या कालव्यावरील पूल मागील बारा वर्षापासून नादुरुस्त असल्यामुळे टाकळीअंबड, घेवरी,आवडे उंचेगाव, विठ्ठल नगर, हनुमान नगर ,शिवाजीनगर, रामनगर, विहामांडवा येथील नागरिकांना सात किलोमीटर अंतर जाण्यासाठी वळसा घेऊन 20 किलोमीटर अंतर दूरवरून जावे लागत आहे .यामुळे नागरिकांना शाळकरी विद्यार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे . याबद्दल होणाऱ्या त्रासासाठी विहामांडवा येथील सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र पन्हाळकर, तय्यब पटेल, ॲड राहुल धायकर व विहामांडवा येथील नागरिकांनी प्रत्येक वेळेस निवेदन देऊन सदर पूल दुरुस्त करण्याची वेळोवेळी मागणी केली.
परंतु शासनाकडून प्रत्येक वेळेस पुलाचे काम मंजूर झाले आहे , टेंडर निघणार आहे ,लवकरच पुलाचे काम सुरू होईल, अशी खोटी आश्वासने दिले गेल्यामुळे व पुलाचे काम सुरू न केल्यामुळे नागरिकाचे होणारे हाल लक्षात घेऊन व्यापारी महासंघ अध्यक्ष राजेंद्र पन्हाळकर व ॲड राहुल धायकर यांनी पाटबंधारे विभागाला निवेदन दिले आहे.
एक सप्टेंबर पर्यंत कार्यवाही झाली नाही तर औरंगाबाद येथील कडा ऑफिस समोर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.