पुसद तालुक्यातील पुस धरण यावर्षी लवकरच ओव्हरफ्लो झाल्यामुळे धरणाच्या सांडव्यावरुन मोठया प्रमाणात पाण्याचा विसर्गही होत आहे .निसर्गसौंदर्य व पर्यटन करण्यासाठी शहरासह इतर ठिकाणांहूनही मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्गही होत आहे .निसर्गसौंदर्य व पर्यटन करण्यासाठी शहरासह इतर ठिकाणांहूनही मोठ्या प्रमाणात पर्यटक याठिकाणी जात आहेत .तर अनेक हौसे गवसे युवक पर्यटनाच्या नावावर धरणाच्या डॅम परिसरात धुडगूस घालीत असल्याचे वास्तव चित्रही दिसत आहे .धरणाच्या खालील बाजूस असलेल्या सांडव्याच्या टाक्यांमध्ये सात आठ फुटांच्यावर पाणी आहे .याठिकाणी काही तरूण  पोहण्याचा पराक्रम करीत असल्याचं दिसत आहेत तर प्रमाणात तैनात करण्याची आवश्यकता असतानासुद्धा जलसंपदा विभागामार्फत तशी तजवीज केली नसल्याचे दिसत आहे .पहारेकऱयांना न जुमानता ही काही युवक पर्यटक सर्रास  धोक्याच्या ठिकाणी जात आहेत .याठिकाणी त्वरीत जलसंपदा विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्वरित लक्ष देऊन सुरक्षा रक्षक  तैनात करणे गरजेचे आहे जेणेकरून एखादी दुर्दैवी घटना घडणार नाही  .गतवर्षी अशाच एका युवकाला प्राणास मुकावे लागले होते.रात्रभर शर्थीचे प्रयत्न करून शेवटी पहाटे पहाटे यंत्रणेला त्याचा मृतदेह हाती लागला होता .अतिशय महत्त्वपूर्ण असलेल्या अशा ठिकाणची सुरक्षा व्यवस्था अतिशय कडक असणे अत्यंत गरजेचे असतानासुध्दा सुरक्षा वाऱ्यावर सोडल्याचे चित्र दिसत आहे .