लोणीकंद पोलिसांनी घरफोडी करणा-या दोन आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत. शिवाय, त्यांच्या ताब्यातून मुद्देमाल जप्त केला असून, पोलिस पुढील तपास करत आहेत.
लोणीकंद पोलिस स्टेशनमधील तपास पथकाचे पोलिस उप निरीक्षक सुरज गोरे टिमसह हद्दीमधील मार्शल यांचेसोबत वाहणचोरीचे अनुषंगाने गस्त घालत होते. पोलिस अंमलदार प्रदिप भुजबळ व गणेश डोंगरे यांना बातमी मिळाली कि, दोन जण वाघेश्वर चौक या ठिकाणी थांबले असुन त्यांचे ताब्यातील गाडीला मागील बाजूस नंबर प्लेट नाही. शिवाय, त्यांचेजवळ कॅम्प्युटर डिसप्ले, इनव्हर्टर, बॅटरी, व अॅम्प्लीफायर असून ते चोर असण्याची शक्यता आहे.
सदरची बातमी मिळाल्याने लागलीच पोउपनि सुरज गोरे टिमसह वाघेश्वर चौक येथे जाऊन सातव हायस्कूल समोर रोडचे कडेला वरील बातमीप्रमाणे दोन जण उभे असल्याचे दिसले. त्यांचेजवळ कॅम्प्युटर डिसप्ले, इनव्हर्टर, बॅटरी, व अॅम्प्लीफायर अशा वस्तु असलेबाबत खात्री झाल्याने दोघांना स्टाफचे मदतीने ताब्यात घेवून चौकशी केली असता सदरचे इसम उडवाउडवीची उत्तरे देवू लागले. लोणीकंद पोलिस स्टेशन येथे त्यांना आणले. १) महेश ऊर्फ मायकल नवनाथ कांबळे (वय २७ वर्ष, रा. लेन नंबर ९, बडोदा बँकेच्या मागे, थिटे वस्ती, खराडी, पुणे १४), २) सोमेश्वर ऊर्फ सोमेश फागण येडे (वय २८ वर्ष, रा. सध्या रा. के/ऑफ सागर भंडारी, लेन नंबर ९, थिटे वस्ती, खराडी, पुणे १४ मुळ पत्ता- मु.पो. निरज, पोस्ट दासगाव, ता. गोंदीया, जि. गोंदीया) अशी दोघांची नावे आहेत.
दोघांच्या ताब्यातील मोटर सायकलचे पुढील बाजुस असलेल्या नंबर प्लेटवरील नंबर पाहिला असता सदरचा नंबर एम. एच. १४ एफ. ए. ४१४५ असा असल्याचे दिसून आले. त्यांना विश्वासात घेवून अधिक चौकशी करता त्यांनी त्यांचे ताब्यातील मोटर सायकल ही खराडी येथील एचपी पेट्रोलपंपाचे मागे असलेल्या लेबर कॅम्पमधून चोरी केली असल्याचे सांगितले. तसेच कॅम्प्युटर डिसप्ले, इनव्हटर, बॅटरी, व अॅम्प्लीफायर हे पेरणे फाटा येथील विसड्म इंग्लिश स्कुल येथून चोरी केले असल्याचे सांगितले. पोउपनि गोरे यांनी आरोपींची पोलिस कस्टडी घेऊन अधिक विचारपूस करता त्यांनी पोलिस कस्टडीमध्ये चंदननगर पोलिस स्टेशन येथील आणखी एक बजाज पल्सर १८० मोटारसायकल तसेच लोणीकंद पोलिस स्टेशन येथील ढगेवस्ती रामचंद्र कॉलेज येथील एक घरफोडी केलेचे निष्पन्न झालेले आहे. तरी वरील आरोपींकडून खालील गुन्हे उघड झालेले आहेत.
१) लोणीकंद पोलिस स्टेशन गु.र.नं. ४२६ / २०२२ भादवि ४५४,४५७,३८०.
२) लोणीकंद पोलिस स्टेशन गु.र.नं. ४०४/२०२२ भादवि ४५४,४५७,३८०.
३) चंदननगर पोलिस स्टेशन गु.र.नं. २९५ / २०२२ भादवि ३७९.
४) चंदननगर पोलिस स्टेशन गु.र.नं. २९९/२०२२ भादवि ३७९. असा एकुण ९८,०००/- रुपये किंमतीचा मुद्देमाल आरोपीतांकडून हस्तगत केला आहे.
सदर कामगिरी अप्पर पोलिस आयुक्त पुर्व प्रादेशिक विभाग नामदेव चव्हाण, पोलिस उपआयुक्त परीमंडळ - ०४ रोहीदास पवार, सहा. पो. आयुक्त येरवडा विभाग किशोर जाधव, लोणीकंद पोलिस स्टेशन वपोनि गजानन पवार, पोनि गुन्हे पाटील यांचे मार्गदर्शनाखाली तपास पथकातील सपोनि गजानन जाधव, निखिल पवार, पोलिस उप निरीक्षक सुरज गोरे, पोलिस अंमलदार बाळासाहेब सकाटे, कैलास साळुंके, विनायक साळवे, स्वप्निल जाधव, अजित फरांदे, समीर पिलाणे, दिपक कोकरे, पांडुरंग माने, अमोल ढोणे, साई रोकडे यांनी केली आहे.