उस्मानाबाद (आप्पासाहेब गोरे) ).वाशी,जि.उस्मानाबाद गणेशोत्सव म्हणजे तरुणाईचा जल्लोष व उत्साहाचा सण. अवघ्या दहा दिवसावर आलेल्या या सणाला गणेश मूर्ती तसेच गौरीचे मुखवटे तयार करणारे कारागीर शेवटच्या रंग=रंगोटीचा हात फिरवत आहेत.यंदा कच्चा माल,पी.ओ.पी.,रंग व ईतर रंगद्रवे यांच्या किंमतीत वाढ झाल्याने गणपती बाप्पालासुध्दा महागाईची झळ पोहोचली आहे.उंच मुर्तीवरील बंदी उठवल्याने मूर्तीच्या मागणीतही वाढ झाली आहे.तसेच मातीच्या मुर्ती बनविण्यासाठी शाडू,लाल माती मिळत नाही.
गेल्या दोन वर्षांत कोरोनामुळे उपासमारीची वेळ आली,पारंपारीक व्यवसाय असल्याने दुसरा काय धंदा करावा.यावर्षी कच्चा माल,रंग,पी.ओ.पी महागल्याने गणपती मूर्तीसुध्दा ३०टक्के महाग विकाव्या लागणार आहेत.मोठ्या मुर्तीप्रमाणेच लहान मुर्तीलासुध्दा कलाकुसर करावी लागते पण लहान मूर्तीला म्हणावा तसा भाव मिळत नाही.मुर्तीच्या उंचीनुसार व रंग कलाकुसरीवर दाम मिळतो.कच्चा माल बार्शी,सोलापूर येथून मागतो व गणेश मुर्ती स्थानिक नागरिक व गणेश मंडळाना विकतो.त्याचबरोबर पुणे,बार्शी व ईतर ठिकाणी आर्डर नुसार मुर्ती बनवून पाठवतो असे वाशी येथील मुर्ती कारागीर बाळासाहेब कुंभार यांनी सांगितले.