कृषिमंत्र्यांना बोर्डीकर यांचे साकडे; पिकांचे पंचनामे तात्काळ सुरु करावेत
परभणी:ता.21- जिल्हयात 52 पैकी 24 मंडळात अतिवृष्टी झाली त्यापैकी 12 मंडळात दोन वेळेस झाली.
तरी जिल्हा प्रशासनाने पंचनामे केलेले नाहीत. सदरील पंचनामे तरी तात्काळ पिकांचे पंचनामे सूरू करावेत अशी मागणी
नांदेड येथे कृषी मंत्र्यांसोबत झालेल्या आढावा बैठकीत आ मेघना बोर्डीकर यांनी केली.
परभणी जिल्ह्यात जुलै महिन्यात 31 पैकी 5 दिवस सोडले तर रोज सतत पाऊस झाला.
प्रशासना कडे 24 मंडळात अतिवृष्टी ची नोंद आहे, पुराच्या पाण्याने दोन व्यक्ती वाहून गेल्याची प्रशासन सांगत.
पुरा ने मनुष्य जनावर वाहून दगावली असताना नदी, ओढया काठच्या जमीन आणि पिकांचे नुकसान झाले नाही का? असा सवालही आ बोर्डीकर यांनी केला.
स्व.गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेचे प्रस्ताव राज्य सरकारने प्रीमियम भरला नसल्याने एप्रील महिन्या पासून पेंडीग आहेत.
राज्य सरकारणे आपला प्रीमियम वीमा कंपनी कडे भरून या मदतीच्या प्रतीक्षेतील कुटुंबांना सहकार्य करावे , पोखरा व महा डीबीटी योजनेतील शेतकरी लाभार्थ्यांचे शासनाकडील अनुदान द्यावे अशी ही मागणी आ मेघना बोर्डीकर यांनी केली.