सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग विभागामार्फत अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी महाडीबीटी प्रणालीवरील भारत सरकार मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती, शिक्षण शुल्क, परिक्षा शुल्क व इतर ऑनलाईन योजनांचे प्रथम वर्षाचे व नुतनीकरणाचे अर्ज भरण्यासाठी महाडीबीटी पोर्टल माहिती तंत्रज्ञान विभागामार्फत कार्यान्वीत करण्यात आले आहे. परंतु अनुसूचित जाती प्रवर्गाचे महाडिबीटी पोर्टलवरील सन २०२१ -२२ या शैक्षणिक वर्षातील अर्ज महाविद्यालयाच्या स्तरावर मोठ्या प्रमाणात प्रलंबित असल्याचे महाडिबीटी प्रणालीवरील डॅशबोर्डनुसार निदर्शनास येते. त्यानुषंगाने वारंवार महाविद्यालयाकडे प्रलंबित अर्जाची शासन निर्णयानुसार पडताळणी करुन सर्व पात्र विद्यार्थ्यांचे अर्ज जिल्हा कार्यालयाचे लॉगीनला विहित मुदतीत ऑनलाईन पाठविण्याबाबत वेळोवेळी पत्राव्दारे, प्रसिध्दीपत्रकाद्वारे, दूरदृष्य प्रणालीव्दारे व व्हॉटसॅप ग्रुपद्वारे सुचित करण्यात आले आहे.तरीही अद्याप सन २०२१-२२ या शैक्षणिक सत्रातील अनुसूचीत जाती प्रवर्गातील आपले महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे अर्ज महाविद्यालय स्तरावर प्रलंबित असल्याचे निदर्शनास येत आहे. सर्व कनिष्ठ, वरिष्ठ, व्यावसायीक, बिगर व्यावसायीक, महाविद्यालय यांना पुन्हा सुचित करण्यात येते की, महाविद्यालयस्तरावरील सदर प्रलंबित अर्जाची पडताळणी करुन पात्र अर्ज तात्काळ सहाय्यक आयुक्त, समाज कल्याणचे लॉगीनला विहित मुदतीत ऑनलाईन पाठविण्यात यावे. जेणेकरून कोणताही बिद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहणार नाही. महाविद्यालयस्तरावरून अर्ज सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय स्तरावर विहीत मुदतीत प्राप्त न झाल्यास व विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहिल्यास याची सर्वस्वी जबादारी संबंधीत प्राचार्य यांची राहील. असे समाज कल्याणचे सहायक आयुक्त मारोती वाठ यांनी कळविले आहे.
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
MCN NEWS| वैजापूर शहरातील कुख्यात गुंड हर्सुल कारागृहात स्थानबद्ध
MCN NEWS| वैजापूर शहरातील कुख्यात गुंड हर्सुल कारागृहात स्थानबद्ध
માલગઢમાં એક શામ ભેરુ ભગવાન કે નામ ભજન સંધ્યા યોજાઇ
ડીસા તાલુકાના માલગઢ ગામની જોધપુરીયા ઢાણીમાં વિદ્યમાન ભૈરવધામ પર ડૉ. નવીન માળી અને વિમલ ભાટી તરફથી...