देश एकीकडे स्वातंत्र्याचा ७५वा अमृत महोत्सव साजरा करीत आहेत. तर दुसरीकडे मात्र याच भारताचं भविष्य रस्त्यावर भीक मागताना दिसत आहे. अमरावती येथील या व्हिडियोतून समाजातील भयाण वास्तव आपल्या पुढे आले आहे. हा व्हिडियो अमरावती येथील गर्ल्स हायस्कूल चौकामधील अमरावती येथील गर्ल्स हायस्कूल चौकामधून माजी महिला आणि बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर प्रवास करीत असताना एक फासेपारधी मुलगी त्यांच्या गाडीजवळ येऊन भीक मागू लागली. लगोलग त्यांनी आपली गाडी बाजूला घेत या मुलीची चौकशी केली. तर ती मुलगी पळून आपल्या इतर सहकाऱ्यांकडे गेली.

 यावेळी त्यांनी दूरवर बसलेल्या काही मुलांना रस्त्यावर भीक मागताना पाहिले. त्या मुलांची विचारपूस करण्यासाठी गेल्या असता त्या मुलांनी तिथून पळ काढला.यादरम्यान येथील स्थानिकांकडे चौकशी केल्यानंतर ही मुलं त्या भागातील फासेपारधी लोकांची आहेत असे समजले. यावेळी कोणताही विचार न करता ॲड. यशोमती ठाकूर यांनी अमरावतीच्या पोलीस आयुक्त आरती सिंग यांना फोन केला. फासेपारधी लोक कामानिमित्त शहरात येतात, मात्र आपल्या मुलांना मोकळं सोडून भीक मागायला लावतात ही परिस्थिती चिंताजनक असल्याचे ठाकूर यांनी सिंग यांना सांगितले. या मुलांना योग्य ते मार्गदर्शन मिळावं शिक्षण मिळावं त्याचबरोबर त्याला सुधारणा वर्गात दाखल करता यावं यासाठी चर्चा केली. यामुलांच्या शिक्षणासाठी आपण प्रयत्नशील असल्याचे यावेळी त्यांनी स्पष्ट केले.