*बापानेच केला मुलीचा विनयभंग;पाथरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल*
*आरोपी पोलिसांच्या ताब्यात;अटक प्रक्रीया सुरू*
पाथरी:-पाथरी तालुक्यातील हादगाव येथे वास्तव्यास असलेल्या १३ वर्षीय मुलीचा तीच्या बापानेच विनयभंग केल्याप्रकरणी पाथरी पोलीस ठाण्यात पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या बाबत माहीती अशी की,पाथरी तालुक्यातील हादगाव येथे राहणाऱ्या १३ वर्षीय मुलगी १८आॅगस्ट रोजी आपल्या राहत्या घरात एकटी झोपली होती.या दरम्यान दुपारी २:३० वाजेच्या सुमारास तीच्या बापानेच वाईट हेतुने पीडीत मुलीचा विनयभंग केला व या घटनेची वाच्यता केल्यास जिवे मारण्याची धमकी दीली असल्याची पीडीतेच्या आईने पाथरी पोलीस ठाण्यात फिर्याद दील्यावरुन १९ आॅगस्ट ला रोजी पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल झाला असुन आज २० आॅगस्ट आरोपीला ताब्यात घेतले असुन अटक प्रक्रीया सुरु असल्याची माहीती पाथरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राहीरे यांनी दीली.पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक तुरनर करीत आहेत