आरोग्य केंद्र शेंबा आणि चिकोडी लोणवाडी तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र टाकरखेड यांच्या संयुक्त विद्यमाने टी.बी.संशयित व आय.जी.आर.ए.पॉझिटिव्ह रुग्णांचे टीव्ही तपासणी शिबिर प्राथमिक आरोग्य केंद्र शेंबा येथे घेण्यात आले.
लाभार्थ्यांना क्षयरोग आजाराविषयी माहिती देण्यात आली तसेच तपासणी उपचार योजना याविषयी मार्गदर्शन करून रुग्णांची एक्स-रे तपासणी करण्यात आली. जिल्हा सहयोग अधिकारी डॉ. दिनकर खिरोडकर यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका आरोग्य अधिकारी नांदुरा,वैद्यकीय अधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्र शेंबा आणि टाकरखेड यांच्या प्रयत्नाने क्षयरोग तपासणी शिबीर पार पडले. या शिबिरांतर्गत ३९ पेशंटची तपासणी करण्यात आली.
यासाठी बुलढाणा येथून एक्स रे तपासणी ॲम्बुलन्स गाडी आणि टी.बी. टीम आली होती. त्यासाठी डॉ. जुनेद खान सी. एच. ओ, चौथे सर, आरोग्य सहाय्यक, एस के झव्हर औषध निर्माता, सुरेखा चौधरी, जयंती हिवराळे आरोग्य सेविका, संदीप तायडे डी. ई.ओ., भरत खंडे परिचर, श्रीकृष्ण निकाळजे यांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडला.