प्रतिनिधी : ज्ञानेश्वर पाटेकर
छावा ग्रुप, केसनंद 5700 आयोजित अखिल केसनंदगाव भव्य दहीहंडी उत्सव २०२२ चे भव्य आयोजन करण्यात आले असून आज २० ॲागस्ट रोजी सायं ६.०० वाजता जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, केसनंद गाव येथे हा कार्यक्रम होणार असल्याची माहिती छावा ग्रुप चे संस्थापक दत्ता (आबा) हरगुडे यांनी दिली.
कोरोना च्या महामारी नंतर तब्बल दोन वर्षांनी होत असलेल्या सार्वजनिक दहीहंडी सोहळ्याची जय्यत तयारी अंतिम टप्यात आली असून लागिर झालं जी फेम-जयडी/ जीव माझा गुंतला फेम - (श्वेता) पूर्वा शिंदे व फेमस आयटम डांन्सर व लावण्या तारका बैलगाडा फेम जुई शेरकर यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम रंगणार आहे. तसेच गोविंदा साठी Dj मातेश्री 5050 & लाईट शो कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण असणार आहे. तरी परिसरातील नागरिकांनी व गोविंदा यांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन छावा ग्रुप केसनंद यांच्या वतीने करण्यात आले आहे
या संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन व व्यवस्थापन छावा ग्रुप चे संस्थापक दत्ता (आबा) हरगुडे, अध्यक्ष संदीप ढोरे, उत्सव कमिटीचे अध्यक्ष भरत वाबळे, उपाध्यक्ष सिद्धार्थ हरगुडे आदी पदाधिकारी व छावा ग्रुप चे कार्यकर्ते करत आहेत.