मांजरी खुर्द (ता. हवेली) येथील आण्णासाहेब मगर विद्यालयाच्या जवळ बॉम्ब सदृश वस्तू आढळून आल्याची धक्कादायक घटना आज मंगळवारी (ता.२६) सकाळी उघडकीस आली आहे. यामुळे मांजरी परिसरात एकच खळबळ उडाली होती. मात्र, पोलिसांनी तो जुना ग्रेनेड असल्याचे सांगितल्यानंतर नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला. आण्णासाहेब मगर विद्यालयाच्या उजव्या बाजूला बॉम्ब सदृश वस्तू अभिमान रोहिदास गायकवाड यांना दिसून आली. त्यांनी तत्काळ ही माहिती पोलीस पाटील अंकुश उंद्रे यांना दिली. उंद्रे यांनी तत्काळ हि माहिती लोणीकंद पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन पवार यांना दिली. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच बॉम्बशोध पथकही तातडीने घटनास्थळी दाखल झाले.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, त्या ठिकाणी ८ वर्षापूर्वी भराव टाकण्यात आला होता. त्यामध्ये दबलेला जुना ग्रेनेड आढळून आलेला आहे. पावसामुळे ते वर आल्याचे दिसत आहे. तरी, पुढील तपास लोणीकंद पोलीस आणि बॉम्ब शोध पथक करीत आहेत
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
આઝાદી કા અમૃત મહોત્સવમાં પશ્ચિમ રેલ્વેનાં RPF બાઈક રેલીને ગુજરતનાં R'DGP સાહેબના વરદ હસ્તે ફ્લેગ ઓફ.
આઝાદી કા અમૃત મહોત્સવમાં પશ્ચિમ રેલ્વેનાં RPF બાઈક રેલીને ગુજરતનાં R'DGP સાહેબના વરદ હસ્તે ફ્લેગ ઓફ.
Compact SUV सेगमेंट की गाड़ी को July 2024 में है घर लाना, जानें किस पर करना होगा कितना इंतजार
भारतीय बाजार में Compact SUV सेगमेंट के वाहनों को काफी ज्यादा पसंद किया जाता है। ग्राहकों की...
પાલનપુરમાં 1470 રીઢા બાકીદારોને નોટીસ ફટકારાઈ....
પાલનપુરમાં ૧૪૭૦ રીઢા બાકીદારોને નોટીસો ફટકારાઈ....
ભાજપ શાસિત પાલનપુર નગરપાલિકા...
એમ.ડી ડ્રગ્સ સાથે એક ઈસમ ઝડપાયો
#buletinindia #gujarat #ahmedabad