कालठण नं-१ च्या इतिहासात पहिल्यांदाच एका माजी सैनिकाच्या हस्ते ध्वजारोहण व अध्यक्षस्थान.

इंदापूर/प्रतिनिधी:- 

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्त ग्रामपंचायत कालठण नं.१ येथे माजी सैनिक दत्तात्रय सोपान सपकळ यांचे हस्ते ध्वजारोहण करण्यात आले तसेच कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान माजी सैनिक मारुती मोहन भोई यांना देण्यात आले होते. 

यावेळी ग्रामपंचायत सदस्य डॉ.लक्ष्मण सपकळ यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कर्मयोगी शंकररावजी पाटील सहकारी साखर कारखान्याचे संचालक हनुमंत (भाऊ( जाधव यांच्या संकल्पनेतून कार्यक्रमानिमित्त गावातली सर्व आजी व माजी सैनिकांचा सन्मान करण्यात आला. त्यासाठी सरपंच सोनाली संदीप जाधव व उपसरपंच विमल तुकाराम पाडूळे, कर्मयोगी शंकररावजी पाटील सहकारी साखर कारखान्याचे माजी व्हॉईस चेअरमन भागवत गटकूळ, माजी सरपंच विठ्ठल सपकळ.

स्थानिक स्कूल कमिटीचे अध्यक्ष तुकाराम जाधव, माजी उपसरपंच आण्णासाहेब कोळेकर, देविदास पाटील,अर्जुन गटकूळ, ज्ञानदेव कोळेकर, आबासो पाटील, हरिदास पाटील, संतोष पाडूळे, अमोल कदम, संदीप जाधव ,ग्रामपंचायत सदस्य मधूकर क्षीरसागर, दिनकर जगताप, दत्तात्रय जगताप, सदस्या शितल घाडगे, शारदा पाडूळे, मधुरा कदम, सुवर्णा जावळे, ग्रामसेवक दिपक बोरावके, तलाठी आण्णासो मुळे, पोलिस पाटील पुनम जावळे, सोसायटी संचालक विलास गटकूळ, संदीपान सपकळ ,गोरख पाडूळे, बाळासाहेब मदने ,भारत शिंदे ,व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष आण्णासाहेब धोत्रे व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

उत्कर्ष विद्या मंदिर कालठण नं-१ येथे नेव्ही मधील माजी सैनिक हरी कुंभार तसेच मराठी शाळेचे ध्वजारोहण मुख्याध्यापक राजेंद्र जगताप यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. 

सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तंटामुक्तीचे माजी अध्यक्ष दादासाहेब गलांडे यांनी केले तर आभार प्रदर्शन हनुमंत जगताप यांनी मानले