विजेचा शॉक लागून शेतकऱ्यांचा मृत्यू 

"गेवराई मर्दा येथील घटना"

औरंगाबाद/ पैठण तालुक्यातील गेवराई मर्दा येथील शिवारातील एका विहिरीवर विद्युत मोटार चालू करण्यासाठी गेलेल्या व्यक्तीला विजेचा शॉक लागून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना गुरूवारी सकाळी उघडकीस आली असून संदीप मदन पवार (वय२६)असे विद्युत शाँक लागून मृत्यू झालेल्या व्यक्ती नाव आहे.

याविषयी सविस्तर माहिती अशी की, गेवराई मर्दा येथील शेतकरी संदीप पवार हे गुरुवार सकाळी आठ वाजता वीज आल्यावर आपल्या शेतातील विहिरीवर वीजपंप चालू करायला गेले असता विजेचा शॉक लागून ते जमिनीवर बेशुद्ध अवस्थेत पडले होते. घरी का येत नाही म्हणून शेतात बघायला त्यांच्या पत्नी गेल्यावर पती जमिनीवर बेशुद्ध अवस्थेत दिसले त्यांनी हंबरडा फोडला. यानंतर आजूबाजूला राहणाऱ्या शेतकऱ्यांनी धाव घेऊन त्यांना औरंगाबाद येथे शासकीय ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. सदर घटनेची पोलिसांत खबर मिळाली असून, मृत संदीप पवार हे घरातील कर्ते व परिवाराची जबाबदारी त्याच्यावर होती. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, आई वडील , असा परिवार आहे.या घटनेमुळे गेवराई मर्दा व परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश सुरवसे , उपनिरीक्षक सुरेश माळी करीत आहेत.