औरंगाबाद :- (दीपक परेराव) पुंडलिकनगरचे शिल्पकार, ज्येष्ठ शिवसैनिक स्व. पुंडलिक राऊत यांना आज, १८ आॅगस्ट रोजी सकाळी ११ वाजता पुंडलिक नगर येथे स्व.पुंडलिक राऊत यांच्या पुतळ्यास हार घालून ,स्मृति स्थळा वर अभिवादन करण्यात आले.
१८ ऑगस्ट १९९० मध्ये या परिसराचे नाव "पुंडलीक नगर" हे नाव त्यावेळचे खासदार,शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, खासदार स्व.मोरेश्वर सावे,तत्कालीन जिल्हाधिकारी,पोलीस आयुक्त यांच्या उपस्थितीत स्व.पुंडलिक राऊत यांच्या बलिदाना मुळे या परिसराला "पुंडलिक नगर" हे नाव देण्यात आले. विशेष म्हणजे त्या घटने नंतर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे म्हणाले की" संभाजीनगरातील दरोडयात हुतात्मे पत्करलेल्या माझा शाखा प्रमुख "पुंडलिक राऊत" हा शिवसैनिक होता. म्हणून तो हिंदूरक्षणासाठी धावून गेला. हे फक्त माझा शिवसैनिकच करू शकतो " आज रोजी त्यांच्या जयंती व पुण्यतिथी निमित्त त्यांच्या आठवणीला उजाळा देत स्मृती स्थळावर अभिवादन करण्यात आलेे.
यावेळी शहरातील मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती. या मध्ये शिवसेना महानगरप्रमुख किशनचंद तनवाणी, माजी महापौर नंदकुमार घोडेले,पूर्व विधानसभा संघटक राजू वैद्य, युवा सेना उपसचिव ऋषी खैरे, जिल्हाप्रमुख हनुमंत शिंदे, शहरप्रमुख विश्वनाथ स्वामी, शहरप्रमुख ज्ञानेश्वर डांगे, विजय वाघचौरे, बाळासाहेब गायकवाड, उपशहरप्रमुख संतोष खेंडके,राष्ट्रवादी पूर्व शहर अध्यक्ष विठ्ठलराव जाधव,प्रकाश महाजन,वैभव मिटकर,माजी उपशहर प्रमुख दिग्विजय शेरखाने, संजय बारवाल, माजी नगरसेवक गजानन मनगटे,मनोज गांगवे, मनोज बोरा ,सूर्यकांत जायभाये, दिलीप बनकर, भास्कर अधाणे, लक्ष्मण बताडे, बापू कवळे, किरण लखनाणी, सोमनाथ बोंबले,बबन डिडोरे ,विशाल गंगावणे, मनोज सोनवणे, सिद्धार्थ वडमारे, अमोल देशमुख,संजय बोराडे,अशोक दामले,राज नीळ,बाजीराव सोनवणे, स्वप्निल चव्हाण, प्रशांत जगताप,भारत ढवळे, रामेश्वर कोरडे, आदींची उपस्थिती होती.