बीड जिल्हारुग्णालय सी.एस.पदी शासन निर्णयानुसार डॉ. सूर्यवंशी यांची नेमणूक कायम करण्यात यावी.
अप्पर मुख्य सचिव यांच्याकडे अजय सरवदे यांची तक्रार
बीड (प्रतिनिधी) शासकीय रुग्णालय बीड याठिकाणी तत्कालीन जिल्हाशल्यचिकित्सक डॉ.अशोक थोरात यांनी प्रचंड प्रमाणात भ्रष्टाचार केल्याच्या तक्रारीवरून त्यांची बीड येथून बदली करण्यात आली होती. डॉ.अशोक थोरात यांचे जागेवर डॉ.सूर्यकांत रामचंद्र गित्ते यांची जिल्हाशल्यचिकित्सक म्हणून नियुक्त केले होते. परंतु प्रामाणिक व शिस्तबद्ध काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना मंत्रालयीन लेवलवरून हातमिळवणी करून राजकीय दबावतंत्राचा वापर करत बाजूला केले. डॉ.साधना तायडे संचालक आरोग्य सेवा मुंबई यांचे पत्र क्र 1775-1780 दि.10 जून 2021 अन्वये नेहमी वादग्रस्त दादागिरी वृत्तीचे डॉ.सुरेश साबळे, प्रभारी वैद्यकीय अधीक्षक ग्रामीण रुग्णालय माजलगाव यांचेकडे जिल्हाशल्यचिकित्सक जिल्हा रुग्णालय बीडचा अतिरिक्त पदभार देण्यात आला. डॉ.सुरेश साबळे यांनी विरोधात उभे राहणाऱ्या डॉक्टरवर हल्ले घडवून आणणे, पीसीपीएनडीटी ऍक्टचे उल्लंघन, मीरा एखंडे प्रसूती दरम्यान माता व बालकाचा मृत्यू प्रकरण असेल, डॉ.साबळे यांचेवर गुन्हे दाखल असल्याची माहिती मिळाली आहे. अश्या वादग्रस्त व्यक्तीची वर्तवणूक पडताळणी करणे अपेक्षित असताना. राजकीय दबावतंत्राचा वापर करत जिल्हाशल्यचिकित्सक पदी नेमणूक करणे नियमबाह्य आहे. प्रकरणी अतिरिक्त कार्यभार सोपवीताना विचारात घ्यावयाच्या मार्गदर्शक सूचनेचे पालन झाले आहे का? शासन निर्णयाचे परिपत्रकांचे उल्लंघन झाले आहे का? या सर्व गोष्टींची सखोल चौकशी करण्यात यावी अशी मागणी अजय सरवदे यांनी केली आहे.
महाराष्ट्र शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे विनिमय आणि शासकीय कर्तव्य पार पाडताना होणाऱ्या विलंबास प्रतिबंध अधिनियम 2005 च्या कलम 4 (4)(1) व कलम 6 मधील तरतुदीनुसार सक्षम प्राधिकार्यांच्या मान्यतेने महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य सेवा गट-अ मधील जिल्हाशल्य चिकित्सक संवर्गातील अधिकाऱ्यांची नेमणूक केली असून डॉ.सतीश दयाराम सूर्यवंशी वैद्यकीय अधीक्षक ग्रामीण रुग्णालय लासलगाव जि.नाशिक यांची जिल्हाशल्यचिकित्सक जिल्हा रुग्णालय बीड या रिक्त पदी निवड करण्यात आली आहे. डॉ.सतीश दयाराम सूर्यवंशी हे पदभार घेण्यासाठी लातूर परिमंडळ येथे उपस्थित राहिले असता वरिष्ठ अधिकाऱ्यांनी शासनाचे दूरध्वनी संदेशाद्वारे आदेश सांगून लेखी स्वरूपात कळविले आहेत की, डॉ.सूर्यवंशी यांना जिल्हाशल्यचिकित्सक जिल्हा रुग्णालय बीड या पदावर पुढील आदेशापर्यंत रुजू करून घेण्यात येऊ नये.यामागचे कारण काय काय ते स्पष्ट करावे. संबंधित अधिकारी हे मागासवर्गीय असल्याने त्यांना अपमानित करून बदलीच्या जागेवर रुजू करून घेण्यात आलेले नाही. संबंधित शासन बदली प्रक्रियेत दबाव तंत्राचा वापर करत हस्तक्षेप करनाऱ्या अधिकाऱ्यावर शिस्तभंग विषयक कार्यवाही करून ॲट्रॉसिटी-ॲक्टनुसार गुन्हे दाखल करण्यात यावा अशीही मागणी केली आहे.