छत्रपतीसंभाजीनगर -   शहरामध्ये आज रोहिदास पुरा येथील अनुलोम सखी मंच तर्फे महिला दिन साजरा करण्यात आला

या कार्यक्रमास प्रमुख वक्ते म्हणून अनुलोम मराठवाडा विभाग संवादिनी विद्याताई पाठक विजयाताई भोसले मीनाक्षीताई अमराव एडवोकेट कांचन चीपोले सावित्रीबाई फुले महिला एकात्मिक विकास प्रकल्पाचा सोनाली ताई मुळे मनीषा निगडे दीपा सरवणे होती आदींची उपस्थिती होती या कार्यक्रमात महिलांना महीलांच्या आरोग्य विषयी शैक्षणिक सामाजिक आर्थिक कौटुंबिक समस्या यांवर प्रमुख वक्ते विद्याताई यांनी मार्गदर्शन केले विजाताई यांनीही मार्गदर्शन केले मीनाक्षीताई यांनीही विविध विषयांवर महिलांना मार्गदर्शन करण्यात आले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनुलोम संवादिनी मंगल यांनी केले उपस्थित मान्यवरांचे शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आले कार्यक्रमास उपस्थित असलेल्या महिलांना अनुलोम संवादिनी मंगल कस्तुरे यांनी अनुलोम या सामाजिक संस्थेच्या सामाजिक उपक्रमाविषयी माहिती दिली व आलेल्या सर्व मान्यवरांचे आभार मानले