*कैकाडी समाजाला एस टी प्रवर्गात आरक्षण द्या
कैकाडी समाजाच्या बैठकीत एकमताने मागणी*
*छत्रपती संभाजीनगर | दि. १७ :* कैकाडी समाजाला न्यायापासून वंचित ठेवलेले आहे. हा समाज आर्थिक शैक्षणिक व सामाजिक दृष्ट्या आजही मागासलेला आहे. हा समाज आजही डाले विणणे, टोपले विणणे आदी व्यवसाय करून आपली उपजीविका भागवत आहे. या समाजाला शिक्षणापासून दूर राहावे लागले आहे. समाजाची आर्थिक स्थिती अत्यंत दयनीय असून समाजाचा शैक्षणिक आर्थिक व सामाजिक विकास व्हावा तसेच त्यांचे जीवनमान उंचावे यासाठी राज्य शासनाने कैकाडी समाजाला एस टी प्रवर्गात आरक्षण द्यावे अशी एकमताने मागणी गुरुवारी ( दि. १७) कैकाडी सामाज संघटनेच्या बैठकीत एकमताने शासनाकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.
व्यापक बैठकीत समाजातील जेष्ठ नागरिकांनी आपापले मत व्यक्त करताना सांगितले की, महाराष्ट्रात या जातीचे दोन प्रवर्गामध्ये वर्गीकरण करण्यात आले आहे. विदर्भात हा समाज अनुसूचित जातीमध्ये गणल्या जातो तर मराठवाडा व पश्चिम महाराष्ट्र मध्ये व्ही जे एन टी (विमुक्त जमातीमध्ये) मध्ये समाविष्ट आहे. परंतु दिनांक 28/08/2025 रोजी श्री जरंगे पाटील यांनी मुंबई येथे आमरण उपोषण सुरू केले होते. त्या उपोषणाचे तात्काळ दखल घेऊन महाराष्ट्र सरकारने हैदराबाद गॅजेटईयर नुसार मराठा कुणबी यांना गॅजेटियरनुसार ओबीसी जात प्रमाणपत्राबाबत दिनांक 02/09/2025 ला एक शासन आदेश काढून मराठा समाजाला आरक्षण देण्याचा शासन आदेश काढण्यात आलेला आहे. महाराष्ट्र मंत्रिमंडळाच्या माध्यमातून हा शासन आदेश निघालेला आहे. त्यामध्ये मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याचे आदेशित असून त्यानुसार महाराष्ट्रामध्ये पुरावे असलेल्या मराठा समाजातील लोकाना कुणबी जातीचे प्रमाणपत्र देण्याचे प्रक्रियेस वेग आलेला आहे. नॅशनल कमिशन फोर डी नोटिफाइड नॉमेडीक अँड सेमी नॉमेटिक Tribes (मिनिस्ट्री ऑफ सोशल जस्टीस अँड एम्पॉवरमेंट 2015 नुसार कैकाडी समाजाची एस सी अनुसूचित जाती प्रवर्गा शिफारस करण्यात आली आहे व सदर शिफारस केंद्राकडे पाठविण्यात आलेली आहे. त्यानुसार आज तगायत कोणतीही कार्यवाही करण्यात आलेली नाही. एका राज्यात एक जात दोन जातीच्या प्रवर्गामध्ये समाविष्ट असल्याने आपणास विनंती की हैदराबाद गॅजेटियानुसार सरसकट कैकाडी समाजाला एसटी अनुसूचित जमाती प्रवर्गामध्ये आरक्षण लागू करण्यात यावे.
मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या अनुषंगाने महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच सामाजिक न्याय मंत्री व छत्रपती संभाजी नगरचे पालकमंत्री संजय शिरसाट यांना कैकाडी संघटनेच्या वतीने निवेदने दिलेले आहेत. तसेच समाजाच्या मेळाव्या मार्फत महाराष्ट्र शासनाकडे कैकाडी समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षण मिळण्याकरिता विनंती करण्यात आलेली आहे. या व्यापक बैठकीस महाराष्ट्र कैकाडी समाज संघटनेचे अध्यक्ष ज्ञानेश्वर जाधव, सचिव पोपटराव गायकवाड, बाबु मामा पवार रोहिदास आण्णा जाधव प्राध्यापक विष्णू जाधव सर नारायण पवार, पप्पू जाधव कार्यक्रमाचे प्रास्ताविक युवक सचिव विक्की जाधव यांनी केले .ज्ञानेश्वर मेंडके शिवनारायण गायकवाड, शिवाजी गायकवाड, विष्णू जाधव, ज्ञानेश्वर मेंडके, उद्धव गायकवाड, हर्षकुमार गायकवाड, श्रीकांत मेंडके, खंडू जाधव, सूरज गायकवाड, विष्णू जाधव, विष्णू पहेलवान खंडू जाधव रामेश्वर माने एस एल गायकवाड राशीन सुभाष जाधव रवींद्र गायकवाड उद्धवराव गायकवाड आदींची उपस्थिती होती.