आज मराठवाडा मुक्ती संग्राम दिना निमित्त हुतात्म्यांना सर्व स्वातंत्र्य संग्राम सेनानींना अभिवादन करण्यासाठी व ध्वजारोहण करण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री नामदार देवेंद्रजी फडवणीस साहेब यांना भीमनगर भावसिंगपुरा प्रभाग क्रमांक 3 च्या 30,000 ते 40,000 वाढलेली लोकसंख्या लक्षात घेता तसेच परिसरामध्ये वाढलेली अवैध दारूचे विक्री तसेच गांजा व बटन विक्री मोठ्या प्रमाणात होत आहे व नशेखर उघड्यावर नशा करत बसतात, त्यामुळे महिला शाळकरी व महाविद्यालयीन मुलीनां आमच्या या परिसरामध्ये असुरक्षित वाटतय तसेच मागील काही वर्षांपासून परिसरामध्ये 7 ते 8 खून मर्डर ही झालेले आहेत,
परिसरामध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झालेले आहे तसेच मागील 10 वर्षांपासून नागरिकांची या परिसरामध्ये पोलीस ठाणे उभारण्याची मागणी आम्ही सर्व सातत्याने करत आहोत करिता तात्काळ आमची ही कायदेशीर मागणी मान्य करून पोलीस ठाणे मंजूर करावे ही नम्र विनंती अशा प्रकारे निवेदन मुख्य मंत्र्यांना देण्यात आले, यावेळी जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार संजयभाऊ शिरसाट साहेब, आमदार प्रदीप भाऊ जैस्वाल साहेब,खासदार संदिपान जी भुमरे, खासदार भागवत कराड साहेब,मनपा आयुक्त जी श्रीकांत साहेब,तसेच पोलीस आयुक्त आदरणीय प्रवीण पवार साहेब या सर्वांच्या समक्ष शिवसेनेचे पदाधिकारी नेते ॲड. बाबा भाऊ तायडे यांनी पोलीस ठाणे मंजूर करण्यासंदर्भात निवेदन दिले यावेळी माझे सहकारी सुभेदार शेषराव आरक दादा,सुभेदार मेजर शिवाजीराव घोबले दादा, सुभेदार सुभाष दादा कदम, हवलदार राजूभाऊ जोगदंडे, रतन दादा सुरडकर, राजूभाऊ जाधव, धम्मा भाऊ सुरासे, ओमकार चक्रे,धर्मानंद जाधव,आदी उपस्थित होते.