राष्ट्रीय लोक अदालतमध्ये वाशिम जिल्हा पोलीस दलाची उल्लेखनिय कामगिरी
1227 न्यायप्रविष्ठ प्रकरणे निघाले निकाली .
शासनाच्या वतीने दोषसिध्दीचे प्रमाण वाढविणे करीता वारंवार शासन परिपत्रके / मार्गदर्शक सुचना प्राप्त होतात . त्या अनुषंगाने वाशिम जिल्हा मा . पोलीस अधिक्षक , श्री . बच्चन सिंह यांनी आपले अधिनस्त सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी तसेच सर्व पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी यांना वारंवार सुचना , मार्गदर्शन करुन शासनाचे परिपत्रकांचे कटाक्षाने अनुपाल होणे करीता जिल्ह्याचे ठिकाणी स्थापीत TMC सेल वाशिमचे मार्फतीने सर्वोतोपरी प्रयत्न सुरु ठेवले आहेत . त्यामुळे वाशिम जिल्ह्यातील सर्व पो.स्टे . च्या वतीने न्यायप्रविष्ट करण्यात आलेल्या प्रत्येक गंभीर व किरकोळ प्रकणाचा जातीने पाठपुरावा करण्यात येत आहे . दि . १३.०८.२०२२ रोजी शासनाच्या वतीने राष्ट्रीय लोक अदालतचे आयोजन करण्यात आले होते . त्याअनुषंगाने वाशिम जिल्ह्यातील सर्व पोलीस स्टेशन कडून न्यायप्रविष्ट करण्यात आलेल्या जास्तीत जास्त प्रकरणांचा निपटारा होणे करीता व त्या व्दारे वाशिम जिल्ह्याचे दोषसिध्दीचे प्रमाणात वाढ होणे करीता पोलीस अधिक्षक बच्चन सिंह यांच्या सुचना व दिलेले लक्ष पुर्णत्वास नेणे करीता मागील १५ ते २० दिवसांपासून सतत पर्यत्न करुन लोकअदालत अनुषंगाने न्यायलायाकडून काढण्यात आलेल्या एकून २६९७ समन्स / नोटीसांची पोलीसांकडून बजावणी करण्यात येवून प्रत्यक्ष लोक अदालतमध्ये पुढील प्रमाणे प्रकरणांतील आरोपीतांना मा . न्यायालयात दोषसिध्दी प्राप्त झाली आहे . दोषारोपचे एकून ७७४ न्यायप्रविष्ट प्रकरणे निकाली निघाले असून त्या सर्वच प्रकरणांमध्ये दोषसिध्दी होऊन २,३८,१०० / - येवढा दंड न्यायालयाचे वतीने आकारण्यात आला आहे . त्याच प्रमाणे मोटार वाहन कायद्याचे एकून २०९ प्रकरणात न्यायालयाने ५२,६०० / - रुपये येवढा दंड आकारला तर ई चलान व्दारे २२७ प्रकरणात ९४,७०० / - येवढा व तसेच इतर १७ प्रकरणात ४,६०० / - रुपये येवढा दंड झाला अशा वरील प्रमाणे एकून १२२७ प्रकरणात ३,९०,००० / - येवढा दंड आकारण्यात आला आहे . यामध्ये पो.स्टे . कारंजा शहर , पो.स्टे . वाशिम शहर , पो.स्टे . कारंजा ग्रामीण व पो.स्टे . मंगरुळपीर यांची कामगिरी उल्लेखनिय झाल्याचे दिसून येते .वरील प्रमाणे उल्लेखनिय कामगिरी करीता पोलीस अधिक्षक बच्चन सिंह यांचे मार्गदर्शनात अपर पोलीस अधिक्षक गोरख भामरे , उप.वि.पो.अधि पुजारी , उप.वि.पो.अधि केडगे , उप.वि.पो.अधि पांडे तसेच जिल्ह्यातील सर्व पो.स्टे . प्रभारी अधिकारी व जिल्ह्यातील सर्व JMFC कोर्ट पैरवी अंमलदार , सर्व समन्स तामीली अंमलदार आणि जिल्हा TMC सेलचे सहा . पोनि . मनिषा तायडे व त्यांचे सहकारी पोहेकॉ . संतोष निखाडे , पोहेकॉ . विष्णु मोटे , पोकॉ . दिपक गिरी यांनी वाशिम जिल्ह्याचे दोषसिध्दीचे प्रमाणात वाढ होणेसाठी सर्वोतोपरी प्रयत्न करुन उल्लेखनिय कामगिरी केली आहे .