वैजापूर :- शैलेंद्र खैरमोडे 

तालुक्यातील मौजे कापूस वाडगाव येथे भारताच्या 75 व्या स्वातंत्र्य महोत्सवानिमित्त निमित्त हर घर तिरंगा मोहिमे अंतर्गत तालुका कृषी अधिकारी   अशोक आढाव मार्गदर्शनाखाली खरीप हंगाम 2022‌ - 23 अंतर्गत राज्य पुरस्कृत कापूस उत्पादन प्रकल्प कापूस उत्पादकता वाढ व मूल्य साखळी विकास योजना अंतर्गत कापूस पिकाची शेती शाळा घेण्यात आली, आजच्या शाळेसाठी तालुक्याचे तालुका कृषी अधिकारी  अशोक आढाव यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. शेती शाळेमध्ये कृषी सहाय्यक श्रीमती मीना पंडित यांनी रासायनिक कीटकनाशकाचे मानवी शरीरावर होणारे परिणाम व रासायनिक कीटकनाशके फवारताना घ्यावयाची काळजी याविषयी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. तसेच कृषी पर्यवेक्षक एम एस गांगुर्डे यांनी फेरोमन ट्रॅप चा वापर त्याचे फायदे कापूस पिकातील गुलाबी बोंड आळी चे व्यवस्थापन कृषी विभागाच्या विविध विविध योजना रासायनिक खत व्यवस्थापन याविषयी मार्गदर्शन केले तसेच तालुका कृषी अधिकारी अशोक आढाव  यांनी उपस्थित शेती शाळेतील शेतकऱ्यांना कापूस पिकातील जैविक एकात्मिक कीड व्यवस्थापन खत व्यवस्थापन मित्र कीटक शत्रू कीटक जैविक औषधी निर्मिती व त्याचे परिणाम व फायदे तसेच कृषी विभागाच्या विविध योजना तसेच तसेच कीटकनाशक फवारणीचा योग्य काळ व प्रमाण याविषयी सखोल मार्गदर्शन केले यावेळी गावातील उपसरपंच सौ मंदाताई थोरात ,नवनाथ पंडित ,मच्छिंद्र पंडित ,अनिल निकम, योगिता पंडित, रुक्मिणी पंडित, शामल पंडित ,गणेश लोखंडे, सुनिता लोखंडे, वंदना पंडित, शांताबाई निकम,अर्चना , पूजा कदम, नितीन कदम, अश्विनी सोनवणे, भाग्यश्री पवार ,भाऊसाहेब त्रिभुवन, अनिल त्रिभुवन, दादासाहेब गवळी ,सुनील निगळ, सुमन त्रिभुवन ,व इतर शेतकरी व महिला भगिनी होते उपस्थित होते.