वाळू माफियांवर नेमके आशीर्वाद कोणाचे महसूल की पोलीस प्रशासनाचे नागरिकांतून उलट सुलट चर्चेला उधाण
पाथरी(प्रतिनिधी)पाथरी तालुक्यातील रात्रीच्या वेळी चालू असलेली अवैध वाळू वाहतूक बिनबोभाट पणे चालू असल्याने या वाळू माफियांवर नेमका आशीर्वाद कोणाचा आहे.यावर पाथरी तालुक्यात व ग्रामीण भागात जोरदार चर्चा रंगू लागली आहे.
सविस्तर बातमी अशी की पाथरी तालुक्यातील मौजे गोंडगाव, गुंज,उमरा येथून दिवसभर गोदावरी पात्रातून वाळू उपसा करण्यात येतो. याकडे महसूल प्रशासनातील तलाठी असतील मंडळ अधिकारी असतील किंवा तहसीलदार व उपविभागीय अधिकारी यांचे मोठ्या प्रमाणावर दुर्लक्ष असल्याचे दिसत आहे.यावरच ना थांबता मौजे गोंडगाव,उमरा, गुंज इथून रात्रीच्या वेळी बिनबोभाट पणे चालू असलेले हायवा,ट्रक,टिप्पर, 407 टेम्पो रस्त्यावर उघड पणे चालू असताना या वाहनांवर नेमके आशीर्वाद कोणाचे महसूल प्रशासनाचे की पोलीस प्रशासनाचे यावर शहरासह ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर उलट चर्चेला उधाण आले आहे.या सर्व प्रकाराकडे जिल्हाधिकारी वेळीच लक्ष देऊन मोठी कारवाई करतील का याकडे मात्र सर्वांचे लक्ष लागले आहे.